*बोरगाव मंजू अनोळखी खुन प्रकरणातील मृतकाची ओळख पटवुन गुन्हयातील आरोपीस अवघ्या १२ तासात स्थानीक गुन्हे शाखा अकोला कडुन अटक*
अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान
दिनांक २२/०५/२०२६ रोजी पो स्टे बोरगाव मंजु हददीतील बोदरखेड शेत शिवार येथील सुभाष यादव यांचे गोडाउनचे समोरील रेल्वे अंडरपास मध्ये एक अनोळखी इसम अंगात फक्त पॅन्ट असून अंगातील टि
हे गळयाभोवती गुंडाळलेले होते तसेच त्यावा चेहरा दगडाने ठेचलेला होता त्यावरून पो.स्टे. बोरगांव मंजु अप.क ३५१/२६ कलम १०३(१), २३८ भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
> घडलेल्या गुन्हयाचे गांभीर्य पाहता मा. पोलीस अधीक्षक सा. अकोला श्री. अर्चित चांडक यांनी गुन्हा उघडकीस आपुन यातील अनोळखी मृतक यावी ओळख पटवुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन तात्काळ अटक करणे बाबत पोलीस निरीदाक श्री. शंकर शेळके स्थागुशा, अकोला यांना आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने पो नि स्थागुशा हे आपले स्टाफसह घटनास्थळी रवाना झाले. व सदरील प्रकरणी मृतक याची ओळख पटवुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे कामी स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी व अमंलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून शोध कामी स्वाना करण्यात आले होते.
> स्थानीक गुन्हे शाखा येथील पथकांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना यातील मृतक याची ओळख पटविणे करीत। अकोला जिल्हयातील व आजुबाजुच्या जिल्हयातील मिसींग व्यक्तींबाबत माहीती घेत असतांना गोपनीय बातमीदारांकडुन माहीती मिळाली कि यवतमाळ येथील विक्की उर्फ बबलु भेंडे हा दिनांक २१/०५/२०२६ चे रात्री पासुन बेपत्ता असल्याची माहीती मिळाली, अशा मिळालेल्या माहीतीवरून पो स्टे अवधुतवाडी, यवतमाळ येथे संपर्क साधुन अनोळखी मृतक बाबत माहीत घेवुन सदरील अनोळखी मृतक हा विक्की उर्फ बबलु राजु भेंडे वय १९ वर्ष रा-गुरुनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ असल्याचे निष्पन्न झाले.
> स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पथकांनी मृतक विक्की उर्फ बबलु राजु भेंडे वय १९ वर्ष रा-गुरुनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ याचे सोबत कोणाचे वाद अथवा भांडणे झाली याबाबत माहिती घेतली असता, मृतक याचा शेजारी राहणारा युवराज शंकर तांगडे वय ४१ वर्षे रा. गुरुनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ याचे सोबत भांडण झाल्याचे समजल्याने त्यास यवतमाळ पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेवुन स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथे आणले.
> आरोपी युवराज शंकर तांगडे वय ४१ वर्षे रा. गुरूनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ याने यातील मृतक यास त्याच्या पत्नी सोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयाच्या कारणावरून दगडाने ठेचुन हत्या केल्याची कबुली दिल्याने आरोपीस पुढील तपास कामी पो स्टे बोरगाव मंजू यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी सा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पोउपनि विष्णु बोडखे, जीपीएसआय दशरथ बोरकर, पोलीस अर्मलदार शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनोने, वसिमोददीन, एजाज अहमद, स्वप्नीलल खेडकर, श्रीकांत पातोंड, अन्सार अहेमद, राजसिंह चंदेल, राहुल गायकवाड, आकाश मानकर, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, अशोका सोनवणे, अमोल दिपके चालक ग्रेड पो.उप. नि. विनोद ठाकरे, रामकिशन डोईफोडे, देवानंद खरात, मनिष ठाकरे यांनी केली. *मीडिया पोलिस टाईम अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान*

