माथाडी कामगारांच्या विरोधातील निर्णय शासनाने तात्काळ बद्दल करावे या मागणीसाठी उद्या लाक्षणीक काम बंद
( रविंद्र आढाळे जिल्हा विशेष प्रतिनिधी )
शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने राज्यातील माथाडी कामगार घेतलेले निर्णया मध्ये सुधारणा करावीया मागणी साठी उद्या दिनांक २ ५ मे रोजी शासन निर्णयाच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणीक बंद करण्यात येणार असल्याची माहिती यावल येथील माथाडी कामगार यांनी यावल तहसीलदार यांना निवेदनाव्दारे दिली आहे . या संदर्भात यावल तालुक्यातील माथाडी कामगार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राज्य शासनाचे अन्न नागरी पुरवठा विभाग माथाडी कामगारांच्या थेट वाहतुकीच्या नांवाखाली कायद्याचे उल्लंघन करून टप्पा टप्याने माथाडी कामगारांची कामे काढली जात असून , शासनाच्या या निर्णयामुळे अनेक माथाडी कामगार हे बेरोजगार होतील, शासनाने घेतलेले निर्णय रद्द करून माथाडी कामगारांना कामाची शाश्वती करून द्यावी तसेच माथाडी कामगाराचें नोकरी अधीनियम १९६९ चे पालन होवु कामगार कायदा कडून कामगारांना न्याय व कष्टाचे योग्य दाम मिळावे असे निवेदनात म्हटले असुन ,माथाडी कामगार बांधवांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे -१ ) माथाडी कामगाराना मिळणारे वेतन हे माथाडी मंडळाकडून देण्यात यावे व नियमा प्रमाणे आधारभूत वेतन द्यावे , २ ) माथाडी कामगारांचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी न करता आज मिळणाऱ्या वेतनापेक्षा कमी होणार नाही ,याची शाश्वती द्यावी , ३ ) माथाडी कामगारांचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी न करता आज मिळणाऱ्या वेतनापेक्षा कमी होणार नाही याची शाश्वती द्यावी , ४ ) माथाडी कायद्याचे संपूर्ण पालन होवुन नोकरी अधिनियम १९६९चे पालन करणे कंत्रादारास शक्तिचे असावे अशा प्रमुख मांगण्या आहेत.वरील सुधारणा शासन निर्णयामध्ये करुन नव्याने निविदा मागवुन माथाडी कामगारांना विश्वासात व शाश्वती द्यावी, याकरीता उद्या दिनांक २५ मे २०२६ रोजी सर्व माथाडी कामगार यावल येथे एकदिवसीय शासकीय गोदाम बंद ठेवुन निषेध नोंदविणार असल्याचे म्हटले असून , मागण्या मान्य न झाल्यास दिनांक २७ मे२०२६पासून शासन निर्णयाच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सोनु बुधो बारी ,रविन्द्र भगवान रावते, सुनिल कडू गजरे , नारायण बुधो बारी,वसत दत्तु बारी , सदाशिव चावदस बारी, रफीयोद्दीन गुलाम रसुल खाटीक , गोकुळ राजाराम बारी ,रविन्द्र सुपडू गजरे आदींच्या स्वाक्षरी आहे .

