हिंगणघाट शहरातील रुबा चौकात असलेल्या आराधना मेडीकल समोरुन मेडीसिनचे बाँक्स चोरी करणारा आरोपी फसला पोलीसांचे जाळ्यात.....................................

हिंगणघाट शहरातील रुबा चौकात असलेल्या आराधना मेडीकल समोरुन मेडीसिनचे बाँक्स चोरी करणारा आरोपी फसला पोलीसांचे जाळ्यात
.....................................
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 
....................................
दिनांक 15/05/2026 रोजी फिर्यादी नामे सौ. सरोज राजेश मानधनिया रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट यांनी पोलीस स्टेशनला येवुन तोंडी रिपोर्ट दिल्याने त्यांचे रुबा चौक हिंगणघाट येथे आराधना  नावाचे मेडीकल असुन मेडीकलमध्ये लागणारी औषधे ही नेहमी वर्धा येथील वेगवेगळ्या एजंसीमधुन गुरुनानक वार्ड हिंगणघाट येथे राहणारा रवि तदानी हा त्याचे आटोमधुन मेडीसिनचे पार्सल घेवुन येतो व ते पार्सल मेडीकल समोर नेहमी ठेवुन निघुन जातो. नेहमी प्रमाणे रवि तदानी याने दिनांक 14/05/2026 रोजी 07/45 वा. चे दरम्यान फिर्यादीचे आराधना मेडीकल समोर मेडीसिनचे  वर्धा येथुन आनलेले दोन बाँक्स ठेवले होते. त्यानंतर सकाळी 10/30 वा. चे दरम्याने फिर्यादीचे पती राजेश मानधनिया हे मेडीकल उघडन्याकरीता आले असता त्यांना  रवि तदानी यांनी ठेवलेले दोन मेडीसिन बाँक्स ज्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीची औषधी असलेली  कि. 11644/- चे दिसुन आले नाही. ते कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले असावे, असा संशय आल्याने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येवुन तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर  गुन्ह्याच्या  तपासामध्ये  पोलीस  स्टेशन  हिंगणघाट  येथील पोलीस  निरिक्षक  अनिल  राउत  यांच्या  मार्गदर्शनात  गुन्हे  प्रगटीकरण  पथकातील पोलीस  अंमलदार  यांनी   सिसिटिव्ही   कँमेरेचे  सुक्ष्म  निरिक्षन  करुन कौशल्यपुर्ण तंत्राचा वापर करुन मेडीसिनचे बाँक्स चोरी करणा-या 
आरोपीचा   शोध   घेवुन   आरोपी  नामे  किशोर  गणपत  गोहने  वय 63 वर्ष यास ताब्यात  घेवुन  त्याचे  कडुन  त्याने  चोरुन  नेलेले  गुन्ह्यातील  विविध  कंपनीची  औषधी भरुन असलेले दोन खर्ड्याचे बाँक्स औषधी किं. 11644/-रु. चा जप्त करुन गुन्हा उघडकिस आणला. सदरची  कारवाई  मा. पोलीस  अधिक्षक  श्री  सौरभ  कुमार अग्रवाल, अपर  पोलीस  अधिक्षक श्री  सदाशिव  वाघमारे, उप  विभागीय  पोलीस  अधिकारी  श्री सुशील कुमार नायक यांचे मार्गदर्शनात, व पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पोलीस निरिक्षक श्री अनिल राउत यांचे प्रत्यक मार्गदर्शनात पो.हवा. नरेंद्र डहाके,  प्रविण बोधाने, पो.अं. आकाश कांबळे यांनी केली.
Previous Post Next Post