संजय भोकरे यांच्या विरोधातील कथित कटाने पत्रकारिताविश्वात खळबळ; पत्रकार संघटना आक्रमक, राज्यभर निषेधाची लाट“सत्यासाठी लढणाऱ्या निर्भीड नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही” शंकर बोरघरेपत्रकारांच्या हक्कासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ राज्यभरातून आवाज बुलंद; निष्पक्ष चौकशीसह कठोर कारवाईची मागणी

संजय भोकरे यांच्या विरोधातील कथित कटाने पत्रकारिताविश्वात खळबळ; पत्रकार संघटना आक्रमक, राज्यभर निषेधाची लाट

“सत्यासाठी लढणाऱ्या निर्भीड नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही” शंकर बोरघरे

पत्रकारांच्या हक्कासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ राज्यभरातून आवाज बुलंद; निष्पक्ष चौकशीसह कठोर कारवाईची मागणी


महेश निमसटकर 
ज़िल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर 



 भद्रावती :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक तथा दैनिक जनप्रवासचे मालक संजय भोकरे यांच्या विरोधात रचण्यात आल्याचा आरोप असलेल्या कथित कटकारस्थानामुळे राज्यातील पत्रकारिता, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यभरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या असून, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
शंकर बोरघरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “संजय भोकरे सर हे केवळ पत्रकार नाहीत, तर हजारो पत्रकारांना दिशा देणारे, सामान्य जनतेच्या न्यायासाठी संघर्ष करणारे आणि सत्यासाठी निर्भीडपणे उभे राहणारे नेतृत्व आहे. पत्रकारिता, सामाजिक चळवळी आणि संघटनात्मक कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. अशा नेतृत्वाविरोधात कट रचला जाणे ही संपूर्ण पत्रकारितेसाठी धोक्याची घंटा आहे.”
ते पुढे म्हणाले की, “सत्य मांडणाऱ्यांना दबावाखाली आणण्याचा आणि संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न काही स्वार्थी प्रवृत्तींकडून केला जात आहे. मात्र महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अशा कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही. आम्ही संजय भोकरे सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि शेवटपर्यंत उभे राहू.”
    दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करून कटामागील खरे सूत्रधार जनतेसमोर आणावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आवश्यक असल्यास विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून तपास करण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर, गडचिरोलीसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पत्रकार आणि कार्यकर्ते एकवटू लागले असून सोशल मीडियावरही समर्थनाची मोठी लाट उसळली आहे. #संजयभोकरे_पाठीशी, #सत्यासाठी_लढा, #पत्रकार_सुरक्षा, #निषेध अशा हॅशटॅगद्वारे समर्थन व्यक्त केले जात आहे.
“आज संजय भोकरे सर यांच्यावर वेळ आली आहे; उद्या कोणत्याही निर्भीड पत्रकारावर येऊ शकते. त्यामुळे पत्रकार सुरक्षेचा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे,” असेही शंकर बोरघरे यांनी नमूद केले.
“संघर्ष थांबणार नाही… सत्याचा आवाज दबणार नाही… आणि पत्रकारांवरील अन्याय कधीही सहन केला जाणार नाही!” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
Previous Post Next Post