कारला खू. येथील दलित वस्तीच्या रोडच्या कामास अखेर सुरुवात.

कारला खू. येथील दलित वस्तीच्या रोडच्या कामास अखेर सुरुवात.

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी: देगलूर

देगलूर: बिलोली तालुक्यातील मौजे कार्ला खुर्द येथील दलित रस्ता गेली तीस पस्तीस वर्षांपासून तसाच पडून राहिला होता, परंतु येथील नागरिक या रस्त्याची मागणी करित होते आणि रस्ता मंजूर झाला. आणि काम चालू झाले. यासाठी येथील ग्रामपंचायत कार्ला खुर्द व पॅनल प्रमुख या सर्वांचे खूप खूप आभार कारण गेली तीस पस्तीस वर्षे या रस्त्याकडे कुणाचे ही लक्ष नव्हते तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी श्री. जमदडे साहेब या कडे लक्ष दिले आणि येथील नागरिकांना वचन दिले की हा रस्ता मी येथे असो की नसो परंतु हा रस्ता करतो आणि अखेरीस हा रस्ता प्रगती पथावर काम चालू आहे येथील नागरिक खूप समाधानी आहेत कारण हा रस्ता दोन समाजाला जोडण्याचे काम करत आहे या साठी आमचे वार्ड मेंबर दोन्ही खूप प्रयत्न केले आहेत व त्यांना लोकांनी पण साथ दिली तसेच या रस्त्यासाठी येथील मा. सरपंच सुरेश गाडेकर व सामाजिक कार्यकर्ते यादव कुडकेकर आणि कार्ला खुर्द चे रहिवासी असलेले माझे बंधू पत्रकार श्री पिंजारी माहेमूद. तसेच मा. तंटामुक्ती अध्यक्ष श्री. नजीर महेबुबसाब शेख व येथील आपरेटर मारोती कुडकेकर आणि समस्थ गावकरी मंडळी यांच्या तर्फे दोन्ही आजी व माजी ग्रामपंचायत अधिकारी यांचे खूप खूप आभार.
Previous Post Next Post