कारला खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानात जून महिन्याचे राशन वाटप सुरळीत.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी: देगलूर
देगलूर:कारला खुर्द, ता. बिलोली येथील शासकीय स्वस्त धान्य दुकान क्रमांक ३ मध्ये जून २०२५ महिन्याचे धान्य वाटप पूर्णपणे सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पडले. दुकानदार श्री. अंकुश पाटील साखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील एकूण ३४२ शिधापत्रिकाधारकांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत नियमानुसार गहू, तांदूळ वाटप करण्यात आले. ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने लाभार्थ्यांना धान्य देण्यात आल्याने गैरप्रकाराला आळा बसला. ग्रामपंचायत सरपंच सचिन बोईनवाड, पोलीस पाटील अशोक कांबळे, कारला कृत चे धान्य दुकान मालक माझी हनुमंत कामांना पाटील, कारला बुद्रुक चे राशन दुकानदार अनिल पाटील व दक्षता समिती सर्व सदस्य उपस्थितीत होते व सर्वांच्या समक्ष वाटप झाले. "मागील काही महिन्यांत धान्य वेळेवर न मिळाल्याच्या तक्रारी होत्या. मात्र यावेळी पुरवठा विभागाने वेळेत साठा उपलब्ध करून दिल्याने एकही लाभार्थी वंचित राहिला नाही," असे सरपंच यांनी सांगितले.लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे व दुकानदाराचे आभार मानले. धान्याचा दर्जा चांगला असल्याचेही नागरिकांनी सांगितले.

