होमगार्डचे द्वितीय त्रैमासिक संमेलन================

होमगार्डचे द्वितीय त्रैमासिक संमेलन
================
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 
================
वर्धा, दि.14 :वार्ड जिल्हा समादेशक होमगार्ड तथा वर्धा जिला अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होमगार्डचे द्वितीय त्रैमासिक संमेलन आयोजिन करण्यात आले होते. यावेळी प्रशासकीय अधिकारी संजय सुरोशे, केंद्र नायक प्रमोद वानखेडे,  पलटन नायक प्रदिप बलवीर, अनंत गजबे, समादेशक अधिकारी हेमलता कांबळे, कैलास रोकडे, सागरकुमार थेरे यांची उपस्थिती होती.
सदाशिव वाघमारे यांनी साप्ताहिक कवायतीमध्ये होमगार्डची संख्या फारच कमी असल्याचे निर्दशनास आले असल्यामुळे होमगार्ड साप्ताहिक कवायतीमध्ये का? येऊ शकत नाही याचा परामर्श घेतला. तसेच होमगार्डच्या अडचणीचे निराकरण करुन जवळच्या पोलिस स्टेशनला साप्ताहिक कवायतीचे आयोजन करण्याबाबत संबंधितांना आदेश दिले.
            यावेळी आपदा मित्रचे प्रशिक्षण घेऊन आलेले होमगार्ड बुध्द जयंती बंदोबस्तासाठी आष्टी येथे कर्तव्यावर असतांना 1 मे रोजी दुपारच्या दरम्यान आष्टी बसस्थानक परिसरात मध्यप्रदेशातून वरुड मार्गे आर्वीकडे बारदाना भरलेल्या ट्रक जात असतांना अचानक धावत्या ट्रकला आग लागली. त्या परिसरात कर्तव्यावर असलेले होमगार्ड अंकित हराळे, देवेंद्र मोहोड, प्रविण ढोक यांनी ट्रक थांबवून आग विझविण्याचे मोठे कार्य केले व होणाऱ्या मोठ्या हाणीपासुन वाचविले. त्याबद्दल सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
            संमेलनामध्ये पुरुष व महिला अशा 680 होमगार्डनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचलन प्रदीप बलवीर यांनी केले तर आभार बाबा तुरक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेश जोशी, चंद्रशेखर शेलकर, नितीन शेंडे, राजेश नवथळकर, नरेश सोनपितळे, सुभाष कांबळे, मुनीर शहा, सचिन विश्वकर्मा, अनिल शेलकर, उमेश झामरे, सुमित शामडीवाल व इतर होमगार्ड यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा समादेश होमगार्ड यांनी कळविले आहे.
Previous Post Next Post