अकोला: सिव्हिल लाईन्स पोलिसांची मोठी कारवाई; देशी कट्ट्यासह तरुण अटकेत*

*अकोला: सिव्हिल लाईन्स पोलिसांची मोठी कारवाई; देशी कट्ट्यासह तरुण अटकेत*

अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान 

 अकोला:अवैध शस्त्रास्त्रांविरुद्ध धडक मोहीम राबवत सिव्हिल लाईन्स पोलिसांनी गुरुवारी आकाशवाणी केंद्र रस्त्यावर मोठी कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून एक देशी बनावटीचा लोहे कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे.गुप्त माहितीच्या आधारे सापळाआकाशवाणी केंद्र परिसरातील रस्त्यावर एक तरुण बेकायदेशीर हत्यार बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती सिव्हिल लाईन्स पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत अत्यंत गोपनीयतेने आणि वेगाने चक्र फिरवली. पोलिसांनी परिसरात वेढा घालून संशयित तरुणाला ताब्यात घेतले.शस्त्र आणि काडतूस जप्तपोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला खोचलेला एक लोखंडी देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले असून, आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ऍक्ट) नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.मुख्य सूत्राचा शोध सुरूहा तरुण सदर बेकायदेशीर हत्यार कोठून घेऊन आला होता? तसेच शहरात तो कोणत्या गंभीर गुन्ह्याला अंजाम देण्याच्या तयारीत होता? यादृष्टीने पोलीस आता आरोपीची कसून चौकशी करत आहेत. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या 'ऑपरेशन प्रहार' मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. *मीडिया पोलिस टाईम अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान*
Previous Post Next Post