🧑🦽🚩*दिव्यांग सेना जळगाव जिल्हा यांच्या कडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड* 🚩👩🦽
यावल भुसावळ तालुका प्रतिनिधी सुरेश खैरनार
*जळगाव : ३१ मे २०२६*
*जळगाव* : राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रसाद साळवी सर यांच्या आदेशानुसार राज्यातील १३ जिल्ह्यानंमध्ये नूतन तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, उपाध्यक्ष शेख शकील, जिल्हा सल्लागार राहुल कोल्हे, गणेश पाटील, जितेंद्र पाटील,जेष्ठ कवी किशोर नेवे काका,यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी भुसावळ तालुका अध्यक्ष पदी करुणा सातदिवे, तर उपाध्यक्ष पदी शशिकांत रायमळे,भुसावळ शहर अध्यक्ष दिनेश मोची, रावेर तालुका अध्यक्ष भगवान कोळी,उपाध्यक्ष निलेश खाचणे,सावदा शहर अध्यक्ष तुषार जैन,चोपडा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष पदी सोमनाथ जगताप यांच्या नियुक्त्या केल्या, या प्रसंगी जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विशाल दांडगे,यावल तालुका अध्यक्ष योगेश चौधरी, सचिव चेतन तळेले,रावेर तालुका सचिव पराग वारके,जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा संघटक खेमराज कोळंबे, जामनेर तालुका अध्यक्ष रमजान तडवी,समाधान पाटील, राजेंद्र ठाकूर, तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.जिल्हा अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि या जळगाव जिल्ह्यात प्रथम दिव्यांग सेना यांचे कार्य व विस्तारा बाबत सांगितले भरपूर मोर्चे व प्रत्येक तालुक्यात व ग्रामीण भागात दिव्यांग बांधवाना ५ % दिव्यांग कल्याणकारी निधी मिळण्याबाबत निवेदन दिले आणि यश सुद्धा आले या पुढे जळगाव जिल्ह्यात एकही दिव्यांग बांधव योजने पासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली,तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून आम्ही दिव्यांग बांधवाना न्याय मिळवून देऊ. असे आश्वासन दिले.

