हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) रेतीघाटावर रेती माफियानी केले जीव घेणारे खड्डे, त्या खड्यात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू*

*हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) रेतीघाटावर रेती माफियानी केले जीव घेणारे खड्डे, त्या खड्यात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू*

**पर्यावरण वाचवा असे आव्हान करणारे प्रशासनच करते पर्यावरण विरोधी वर्तन*

हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा 

हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) रेतीघाटावर रेती माफियानी केले जीव घेणारे खड्डे केले आहे. एकीकडे पर्यावरण वाचवण्याचे आव्हान प्रशासन करते त्यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च करून उपक्रम राबविल्या जाते नदीचे संवर्धन करण्यासाठी  अनेक मोहीमा शासनमार्फत राबविल्या जाते तर दुसरीकडे  मोठ्या प्रमाणात अनधिकृत रेती  रॉयल्टी न भरता हजारो टिप्पर द्वारे रेतीची वाहतूक करण्यात येते त्यासाठी नदीपात्रामध्ये अक्षरशः हायवेप्रमाणे रस्ता तयार करण्यात आला असून या बेकायदेशीर उत्खननामुळे नदीच्या मध्यभागी ३० ते ४० फूट खोल मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.
याच खड्ड्यांमुळे आज एक दुर्दैवी घटना घडली. शेकापूर येथील सामान्य कुटुंबातील राहुल अनिल कोळसे (वय ३५) आणि त्यांचा भाचा नदीपात्रातून जात असताना तोल जाऊन पाण्यात पडला. भाच्याला वाचविण्यासाठी राहुल अनिल कोळसे यांनी प्रयत्न केला असता ते स्वतः खोल खड्ड्यात पडले आणि या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
*या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, या मृत्यूस जबाबदार कोण — प्रशासन की रेती माफिया?* असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, *या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केली आहे.* प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
Previous Post Next Post