नाशिक येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचे रंगतदार आयोजन संपन्न....l
राजु कांबळे
मीडिया पोलीस टाईम
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
विभागीय स्पोर्ट कॉम्प्लेक्स मुंबई आग्रा हायवे आडगाव नाका, हिरवाडी नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कॅडेट & ज्युनिअर कराटे चॅम्पियनशिप 2026 27 पार पडली. स्पर्धेचे आयोजन कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, सर्वेसर्वा माननीय श्री. शिहान संदीपजी गाडे सर ( जनरल सेक्रेटरी ), माननीय श्री. सलोद्दीन अन्सारी सर, ( अध्यक्ष ), माननीय श्री. संदीपजी वाघचावरे सर ( treasurer ) यांनी आपल्या रेफरी , जज आणि व्हॉलेंटर पॅनल मिळून अतिशय मेहनत घेऊन या स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडल्या.
राज्यातील अकोला, अमरावती, अहमदनगर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, मुंबई लातूर ठाणे पालघर पुणे परभणी, यवतमाळ, धुळे, धारावशिव, छत्रपती संभाजी महाराज नगर, नांदेड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, जालना, चंद्रपूर, हिंगोली, बीड, बुलढाणा, नंदुरबार, वर्धा, वाशिम, या जिल्ह्याचे कराटे पटूनी उत्स्फूर्त पणे भाग घेऊन आपल्या कलेचे प्रदर्शन करीत प्रेक्षकांचे मन जिंकले होते.
या कराटे स्पर्धा 6 ते 19 वयोगटात घेण्यात आल्या होत्या. यामध्ये कृमिते आणि सिंगल, डबल, आणि ग्रुप काताज प्रेक्षक का मध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. लहान मुला - मुलींनी आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, रजत मेडलचे मानकरी ठरले. या स्पर्धातील विजय स्पर्धक यांची निवड पुढे होणाऱ्या नॅशनल कराटे स्पर्धा देहराडून येथे करण्यात आली आहे.
सतत चालत असलेल्या चार दिवस कराटे स्पर्धेत 1400 कराटे पटू चा आणि प्रशिक्षक, कोच तसेच पालक वर्गांची विभागीय स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये मोठ्या संख्येने उत्सुंग अशी गर्दी दिसून आली होती.

