पोलीस स्टेशन हिंगणघाट परिसरात रात्र गस्त दरम्यान मा. वरीष्ठांचे आदेशाने अवैध
धंदयावर कार्यवाही दिनांक.6/5/2026
.........................................
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
........…..............................
करीता रवाना असतांना मुखबीर द्वारे खात्रीशीर माहीती मिळाली की, सरकारी दवाखान्याच्या मागील रहीम गॅरेज जवळील दुमजली असलेल्या इमारतीच्या खोली समोर यश श्रावने नावाचा इसम हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने अमली पदार्थ स्वतः सेवन करण्याच्या उद्देशाने बाळगून लोकांना विक्री करीत आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. श्री. सुशीलकुमार नायक साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट व मा. पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. यांना देवून त्याचे आदेशाने खबरेप्रमाणे सापळा रचून NDPS कायद्यान्वये रेड केला असता माहितीप्रमाणे यश श्रावने हा हजर मिळून आला.सदर रूम मध्ये मिळून आलेल्या इसमांना नाव गाव पत्ता विचारले असता आणि त्याचे नाव अनुक्रमे 1) यश सचिन श्रावणे व 21 वर्षे राहणार सेंट्रल वार्ड ,2)
संमवेद विलासराव चेपे वय 26 वर्ष रा.चेपे चौक 3) बादल रामचंद्र भटे 19 वर्ष रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड 4) शुभांगी सुरेश जुमनाके वय 23 वर्ष राहणार संत तुकडोजी वार्ड , हिंगणघाट असे मिळून आले. पंचासमक्ष त्याची कायदेशीर रित्या अंगझडती घेतली असता चार मोबाईल मिळून आले. तसेच रूमची झडती घेतली असता रूम मध्ये 1) एका पांढ-या रंगाचे प्लास्टिक पन्नीमध्ये माफेड्रन नावाचा अमली पदार्थ 6.22 ग्रॅम किंमत 17,790 रू 2) आरोपी त्यांचे गुन्ह्यात वापरले 04 अँड्रॉइड मोबाईल किंमत 40,000 रू असा जु.किं. 57,790 रू चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल फॉरेन्सिक टीमच्या मदतीने जप्त करून आरोपीविरूध्द एनडीपीएस अँक्ट कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा श्री. सुशीलकुमार नायक सा. व मा. पोलीस निरीक्षक श्री अनिल राऊत सा. हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात सपोनि दिपक वानखडे , डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी कार्यवाही केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास पो.नि अनिल राऊत पो.स्टे हिंगणघाट करीत आहे.

