23 जुन जन आक्रोश विराट मोर्चा मध्ये शामिल व्हा, वंचित नेते गौतम वाघमारे.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : जायकवाडी लोहा येथे होणाऱ्या वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन साहेब, यांच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चात देगलूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते शामिल व्हा असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे,माजी तालुका महासचिव गौतम वाघमारे यांनी केले आहे तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना, आवाहन करण्यात येते की दिनांक 23 जून 2026 रोजी लोहा तालुक्यात येथे 1990 पासून जायकवाडी वसाहतीमध्ये पंचशील ध्वज वास्तवास होता तरी राजकारणी प्रस्थापित,लोक षडयंत्र करून बौद्ध धर्माचा पंचशील ध्वज उध्वस्त केला तरी आपला,स्वाभिमान पंचशील ध्वज पुन्हा त्या जागेवर सन्मान आणि बसविण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा दक्षिण यांच्या कडून दिनांक 23 जून रोजी, मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे देगलूर तालुक्यातील हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान वाघमारे गौतम नामदेव वन्नाळीकर वंचित बहुजन आघाडी देगलूर यांनी केले आहे.

