अपघातात मृत झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.यावल पोलिसांनी मोठ्या शिताफीने ३ जणांना अटक केली.

अपघातात मृत झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.

यावल पोलिसांनी मोठ्या शिताफीने ३ जणांना अटक केली.

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.२० ( सुरेश पाटील ) अपघातात मृत झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध यावल पोलिसांनी आपली चौकशीची तपासाची चक्रे जोरदार फिरवून माहिती देणाऱ्यांसह ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.२५ जून पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.या घटनेमुळे यावल तालुक्यात डांभुर्णी,कोळन्हावी, किनगाव परिसरात मोठी खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की की दिनांक 18/06/2026 रोजी रात्री 02.00 सुमारास इसम नामे उमेश दिलीप परदेशी रा. कोळन्हावी ता. यावल याने त्याचे इतर 2 सहका-यांचे मदतीने मयत नामे पवन रविंद्र सोळंके वय-26 वर्षे रा. कोळन्हावी ता. यावल यास मृत आवस्थेत मोटारसायकल वर आणुन ग्रामीण रुग्णालय यावल येथे दाखल केलेले होते. सदर दिवशी उमेश परदेशी याने पवन याचे अपघाती मृत्युसंबंधात यावल
पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केलेली होती. त्याने फिर्याद देतांना सांगीतलेले होते की रात्री 12.00 वाजेचे सुमारास तो मयत तसेच आणखी इतर 2 साथीदारांसह किनगाव येथील राज हॉटेलमध्ये जेवण करुन डांभुर्णी येथे परत जात असतांना डांभुर्णी शिवारात पाटाजवळ त्यांनी लघवीसाठी मोटारसायकल थांबविली असता
मयत पवन सोळंके हा लघवी करण्यासाठी पायी जात असतांना एका ट्रकने पवन सोळुंके यास मागील बाजुने धडक दिल्याने त्याचे डोक्यास गंभीर दुखापत होवून तो जागीच बेशुध्द झाल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले अशा आशयाचे फिर्याद वरुन यावल
पो.स्टे.गुन्हा रजी.नं.234 / 2026 BNS कलम 106(1), 281, 125 (A), 125 (B) सह मोटार वाहन कायदा कलम 134 (A) (B) 184 अन्वये अज्ञात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व सदर गुन्ह्याचा तपास स.फौ.वसंत बेलदार हे करीत होते. अपघाताचे पंचनामा दरम्यान अपघाताचे ठिकाणी रक्त मिळुन मिळुन न आल्याने सदर फिर्यादी बाबत संशय निर्माण झाल्याने घटनास्थळाचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता डांभुर्णी गावचे शिवारात किनगाव-डांभुर्णी रोडपासून सुमारे 200 मिटर अंतरावर हातनुर कॅनॉलमध्ये सिमेंट काँक्रीट वर काही संशयीत रक्ताचे थारोळे व रक्ताचे डाग मिळुन आल्याने व सदर रक्तावर काही ठिकाणी माती टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्या अनुषंगाने अपघाताची खबर देणारा उमेश परदेशी व त्याचे मित्रांना पुन्हा विचारपुस केली असता त्यांनी सुरुवातीस विचारपुस दरम्यान सांगीतले की "मयताचा अपघात झाल्याची त्यांनी खोटी फिर्याद दिलेली होती, प्रत्यक्षात त्या सर्वांनी दिनांक 17/06/2026 रोजी राज हॉटेल येथे दारु
पिल्यानंतर ते मयतासह सदर कॅनॉलजवळ गप्पा मारण्यासाठी गेले असता कॅनॉलचे कडेला असलेल्या सिमेंट काँक्रीटचे कट्ट्यावर मयत हा पडलेला असतांना त्यास झोप लागुन गेली व तो झोपतेच 25 फूट खोल
असलेल्या कॅनॉलमध्ये पडुन त्याचा मृत्यु झाला,गावातील लोक आमचेवर आरोप करतील म्हणून आम्ही अपघाताची खोटी तक्रार दिली असा दुसरा बनाव त्यांनी तपास दरम्यान सांगीतला. त्या अनुषंगाने सदर कॅनॉलचे ठिकाणी जावून घटनास्थळाची पाहणी केली,फॉरेन्सीक व्हॅन चे सहाय्याने मिळालेले रक्त व इतर पुरावे गोळा केले,मयतास झालेल्या जखमा ह्या 25 फुट उंचीवरुन पडल्याने झालेल्या नसल्याचे दिसून येत
असल्याने डांभुर्णी व कोळन्हावी गावातुन गोपनीय माहीती काढुन व परीसरातील तांत्रीक पुरावे जमा करुन सदर गुन्ह्यातील मूळ फिर्यादी व त्याचे साथीदारांना अधिक सखोल व कसुन विचारपुस केली असता त्यांचे
जबाबात विसंगती येत असल्याने तपासाअंती 1) उमेश दिलीप परदेशी वय 32 वर्षे, व्यवसाय मजुरी,रा.कोळन्हावी ता. यावल जि. जळगाव 2 ) चेतन मोतीराम कोळी वय 32 वर्षे, व्यवसाय- भाजीपाला विक्री रा.डांभुर्णी ता. यावल जि. जळगाव ह. मु. शिक्रापुर पुणे  3) लोकेश दिवाकर महाजन वय 32 वर्षे, रा. डांभुर्णी ता. यावल जि. जळगाव यांनी दिनांक 17/06/2026 रोजी रात्री पवन रविंद्र सोळंके वय- 26 वर्षे रा. कोळन्हावी ता.यावल यास दारु पाजून त्यास सदर कॅनॉलचे ठिकाणी मोटारसायकलवरुन नेवून मयताचे डोक्यात दगडाने मारुन
त्याचा खून केल्याची तसेच त्याची चप्पल घटनास्थळावरुन उलचुन घेवून रक्ताचे थारोळ्यावर माती
टाकुन पुरावा नष्ट केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यास खूनाचे व खोटी माहीती देवून पुरावा नष्ट
केल्याबाबतचे भारतीय न्याय संहीता कलम 103 (1), 238, 239, 3 ( 5 ) अन्वये वाढीव कलम लावून सदर आरोपीतांना अटक करण्यात आलेली असुन त्यांना मा. यावल न्यायालयाने दिनांक 25/06/2026 पावेतो पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे.सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान असे ही निष्पन्न झालेले आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे हे करीत आहे. सदरची कारवाई ही श्रीकांत
धिवरे,पोलीस अधीक्षक जळगाव व मा.संदीप गावीत,अपर पोलीस अधीक्षक जळगाव यांचे मार्गदर्शनात अनिल बडगुजर उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर उपविभाग यांचे नेतृत्वात पो. नि.रंगनाथ धारबळे,सपोनि अजयकुमार वाढवे,पो.उ.नि. अनिल महाजन,पो.हे.कॉ. वासुदेव मराठे,पो.हे.कॉ.संदीप सुर्यवंशी,
पो.ना.किशोर परदेशी,पो.कॉ. सचिन पाटील,पो.कॉ.योगेश खोंडे, पो.कॉ.ऐजाज गवळी,पो.कॉ. हितेश बागुल,पो.कॉ.सागर कोळी, पो.कॉ.अल्लाउद्दीन तडवी नेमणुक यावल पो.स्टे.यांनी केलेली आहे.
Previous Post Next Post