यावल शहरात खाजगी शिक्षण संस्था चालकाकडून शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना सक्ती. प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या आदेशाची पायमल्ली आणि शिक्षण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

यावल शहरात खाजगी शिक्षण संस्था चालकाकडून शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना सक्ती. 

प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या आदेशाची पायमल्ली आणि शिक्षण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

( महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.१९ ( सुरेश पाटील )
शिक्षण क्षेत्रात आर्थिक प्रगती करण्यासाठी नावारूपास आलेली एक शिक्षण संस्था मोठ्या रकमेचे आमिष देऊन ती शिक्षण संस्था स्वतःच्या नावावर करून संस्था चालकाने शिक्षण संस्थेत मारवाडी पद्धतीचा व्यापार सुरू केला आणि शैक्षणिक साहित्य विक्रीच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना शाळेतूनच सर्व शैक्षणिक साहित्य विकत घेण्याची सक्ती करीत असल्याने यावल शहरात संस्थाचालका विरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असला तरी शिक्षण संस्था चालकाने पुणे येथील प्राथमिक शिक्षण विभाग संचालक शरद गोसावी यांच्या आदेशाची पायमल्ली केली आणि याकडे यावल तालुका शिक्षण अधिकाऱ्याचे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.

शिक्षण संस्था चालकाने सरदार पटेलांची भूमिका निभावत आपल्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईल नंबर वर एक मेसेज टाकून त्यांना शैक्षणिक साहित्य विक्रीची शक्ती केल्याने पालकांनी त्या शाळेत तीन ते चार वेळा जाऊन जाब विचारला तरीसुद्धा संबंधित संस्था चालक म्हणतो तुम्हाला मी सांगेल त्याचप्रमाणे वागावे लागेल. 

शैक्षणिक साहित्याचे दर पुढील प्रमाणे
सर्व पालकांना सुचित करण्यात
येते की इयत्ता - ८ वी 
या वर्गाची बूक सेट ची किंमत - 6330/- नोटबूक सेट ची
किंमत-1165/- युनीफॉर्म कीट ची
किंमत-4005/-
टिप :- युनिफॉर्म किटमध्ये
रेगुलर युनीफॉ म, सॉक्स ( 4
जोडी ), बेल्ट, ब्लॅक शूज, व्हाईट
याप्रकारे त्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईल / व्हाट्सअप वर मेसेज देऊन शैक्षणिक साहित्य विकत घेण्याची शक्ती केली आहे. या चार-पाच दिवसापासून यावल शहरात अनेकांच्या तक्रारी असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी जळगाव आणि यावल पंचायत समिती मधील शिक्षण अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत का.? असा संशय व्यक्त करीत संस्थाचालक पुणे येथील प्राथमिक शिक्षक विभागाचे संचालक शरद गोसावी यांच्या आदेशाची सुद्धा पायमल्ली करीत असल्याने वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे आता पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.

यावल शहरात शिक्षण क्षेत्रात बाहेर गावाहून आलेला शिक्षण सम्राट आपल्या सोयीनुसार आणि मारवाडी पद्धतीने शैक्षणिक बेकायदा शैक्षणिक धडे शिकवायला लागल्याने शिक्षण क्षेत्रात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Previous Post Next Post