शेळीचे उदर पोषण करणारा वाघाच्या हल्यात मृत्युमुखी

शेळीचे उदर पोषण करणारा वाघाच्या हल्यात मृत्युमुखी

राजु कांबळे 
मिडिया पोलीस टाईम
वर्धा नागपूर विभागीय संपादक 
समुद्रपूर

समुद्रपूर.  : ब्रम्हपुरी वनविभागातील बाळापूर - तरोधी वनपरिक्षेत्रा अंतर्गत नेरी उपवन क्षेत्रातील बद्री महाडी जंगलात शेळी रखवालदार दिलीप जानबा नन्नावरे (वय ४५ ) याचे वर वाघाने प्राणघातक हल्ला करून शेळी रखवालदार मृत्युमुखी पडला. 

दिलीप रोजच्या प्रमाणे आपल्या शेळीसोबत सकाळी जंगलात जाऊन शेळ्यांना चारा द्यायचा.पण घरी परतताना शेळ्या घरी आल्या परंतु दिलीप मात्र घरी पोहचला नाही म्हणून घरच्या लोकांनी दिलीपला फोन लावला पण उचलला जात नव्हता. संशय आल्याने काही गावकरी जंगलाच्या वाटेने गेल्यावर एका जागी फाटलेले कपडे आढळून आले.थोड्याच अंतरावर त्याचा मृतदेह आढळला.

 लागलीच वनविभागाला फोन लावून ताबडतोब तरोधी वन परिक्षेत्र अधिकारी कन्नमवार आपल्या सहकारी कर्मचारी सोबत घटनास्थळी  येऊन घटनेचा पंचनामा केला. वन क्षेत्रपाल तोडासे, वन रक्षक  पाटील, वडझे आणि चिमूर ठाण्याचे पोलीस अधिकारी आपल्या पथका सह प्रामुख्याने उपस्थित होते.पंचनामा करून शव शवविच्छेदनासाठी चिमूर रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतकाच्या पश्चात पत्नी व एक मुलगा तर विवाहित मुलगी असा परिवार आहे. वन्य प्राणी मुळे परिसरातील लोकांचा संतप्त राग आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Previous Post Next Post