स्वाधार योजना लागू करा अन्यथा उपोषण करणार वंचित तालुका,महासचिव गौतम वाघमारे आक्रमक.

स्वाधार योजना लागू करा अन्यथा उपोषण करणार वंचित तालुका,महासचिव गौतम वाघमारे आक्रमक.

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : देगलूर तालुक्यातील शासकीय उद्योगिक प्रशिक्षण संस्था,यामध्ये अनुसूचित जातीच्या  विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने पासून,वंचित ठेवल्या जात आहे याची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीचे माजी महासचिव गौतम नामदेव वाघमारे वन्नाळीकर, यांनी आज दिनांक 1 जून 2026 रोजी समाज कल्याण कार्यालय नांदेड येथील, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे साहेब यांना रीतसर असे निवेदन देण्यात आले आहे, निवेदनात असे म्हटले आहे की देगलूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामध्ये, आयटीआय येथील अनुसूचित जाती येथील विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही लागू करावी, व विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी, अन्यथा प्रशासनाने वेळीच दखल घेऊन मार्ग काढावा अन्यथा समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे आमरण उपोषणाला बसण्याचे निवेदनामध्ये, प्रशासनाला सुचित करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यातील, देगलूर हा तालुका मोठा तालुका असून हा या तालुक्यातील अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थी हे देगलूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयला प्रवेश घेतली असून,त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने पासून वंचित ठेवल्या जात असल्याची बाब,वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गौतम वाघमारे यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी संबंधित विद्यार्थ्यासोबत चर्चा करून,आज रोजी समाज कल्याण कार्यालय अधिकारी यांच्याशी, निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.आणि लवकरात लवकर जर शासनाने यातून मार्ग काढून विद्यार्थ्यांना थेट योजना लागू करून त्यांच्या बँक खात्याची शिष्यवृत्ती जमा करावी, अन्यथा समाज कल्याण कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची निवेदन आज देण्यात आले आहे.
Previous Post Next Post