मानवत पोस्टेचा ए.पी.आय. दर्शन शिंदे यांनी पदभार स्विकारला.*
*
——————————
मानवत परभणी जिल्हा संपादक/ अनिल चव्हाण.
मानवत पोलीस स्टेशन मध्ये नवीन ए.पी.आय. दर्शन शिंदे यांची नियुक्ती तर संदीप बोरकर यांची बदली
मानवत पो. स्टेचा पदभार स्वीकारताच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची ग्वाही; दिली तर यावेळी मानवत शहरातील जागृक नागरिकांकडून स्वागत व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत येथे दिनांक २ जून रोजी मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (ए.पी.आय.) संदीप बोरकर पाटील यांची हिंगोली येथे बदली झाली त्यानंतर त्यांच्या जागी नूतन ए.पी.आय. म्हणून दर्शन शिंदे, पाटील यांनी मानवत पोलीस स्टेशनचा सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारला. सोमवार दिनांक ०२ जून रोजी त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारत मानवत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्या साठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून मानवत पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप बोरकर पाटील यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्या साठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या बदली नंतर नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुढील वाट चालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अब्दुल वहाब बेरवाले व शगिर खान यांनी संदीप बोरकर यांचा सत्कार करून त्यांच्या पूढील भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. तसेच मानवत पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर यावेळी उपस्थित मान्यवर नागरिकांनी नव्या अधिकारी यांच्याकडून शहरातील नागरिकांना न्याय व सुरक्षितता मिळण्यासाठी प्रभावी कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली. मा.श्री.
दर्शन शिंदे यांनी देखील नागरिकांच्या सहकार्याने मानवत शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता व कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले.
***

