फैजपूरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष कलीम खा मन्यार यांचा विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
फैजपूर उपविभागीय संपादक सलीम पिंजारी
: जळगाव स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी फैजपूर येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष कलीम खा मन्यार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून विविध इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. त्याच अनुषंगाने फैजपूरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष कलीम खा हैदर खा मणियार यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी घुगे यांच्याकडे आपले नामांकन पत्र सादर केले.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज संस्थांमधील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव असल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज संस्थांचे सक्षमीकरण, विकासकामांसाठी निधी वेळेवर उपलब्ध करून देणे तसेच लोकप्रतिनिधींच्या हक्कांसाठी लढा उभारणे या प्रमुख उद्दिष्टांसाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कलीम खा मण्यार यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे जळगाव स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली असून त्यांच्या उमेदवारीची जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

