*वझूर बु, सोसायटी परिवर्तन पॅनलच्या ताब्यात
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक अनिल चव्हाण
——————————
मानवत तालूक्यातील प्रतिष्ठित समजली जाणारी वझुर बु. विविध कार्यकारी संस्थेवर शेतकरी परिवर्तन पॅनल ने वर्चस्व सिध्द करून आपल्या ताब्यात ठेवण्यास यश मिळविले.
नविन संचालकाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
तालुक्यातील वझुर बु विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलचे 13 पैकी 10 जागावर दणदणीत विजय मिळवून संस्थेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. तर बळीराजा शेतकरी पॅनाॉलला 3 जागांवर समाधान मानावे लागले. शेतकरी परिवर्तन पॅनाॉलकडुन अशोक रावसाहेब चव्हाण, परसराम शिवाजीराव चव्हाण, भारत बन्सीधर चव्हाण, सुरेश नारायण चव्हाण, सुरेश भिमराव चव्हाण, संजय आत्माराम शिंदे हे उमेदवार विजयी झाले. *महिला राखीव प्रववर्गातुन* आशामती शिवाजीराव चव्हाण, व कौशल्या रोहिदास चव्हाण यांनी विजय मिळवला. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून संभाजी सोपान उजगरे तर भटक्या विमुक्त प्रवर्गातून अनुसया क्रष्णा आव्हाड, विजयी झाल्या.बळीराजा शेतकरी पॅनाॉलमधुन सखाराम किसन चव्हाण, ज्ञानोबा प्रल्हाद चव्हाण व मागासवर्गीय प्रवर्गातून युवराज सखाराम चव्हाण यांनी विजय मिळवला. मतमोजणी चोख पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. निवडणूक अधिकारी यु. एम.शेख यांनी सायंकाळी सात वाजता गावकऱ्यांच्या उपस्थित निकाल घोषित केला. यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
***

