डंपरच्या जोरदार धडकेत पोलीस कर्मचाऱ्यांचा दुदैवी मुत्यु*.

*डंपरच्या  जोरदार धडकेत पोलीस कर्मचाऱ्यांचा दुदैवी मुत्यु*.   
—————————

मानवत परभणी जिल्हा संपादक/ अनिल चव्हाण


पुर्णा ते परभणी वरुन नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकी वरून नांदेड कडे जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांला जबर धडक देऊन जखमी केले.
उपचारा दरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांचा दुदैवी मुत्यु झाला असल्याची घटना पुर्णा शहरातील ताडकळस टि पाॅइंट वर सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास घडली आहे. 
या बाबत सविस्तर वृत्त असे की,
अवजड टिप्पर हा    क्रमांक एम एच 26-3673 हा पुर्णे वरून नांदेड कडे भरधाव वेगाने जात असताना परभणी वरुन नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या मोटार सायकल क्रमांक एम एच- 26-बी.यु.9705 यावर बसून पोलीस कर्मचारी शिवराम मनमथ अस्टुरकर वय 46 वर्ष टिप्परने यांना टिप्परने जोराची धडक दिल्याने अस्टुरकर यांच्या डोक्याला आणि पायाला आणि शरीरा च्या इतर अवयवांना जबर मार लागल्याने ते जखमी झाले. तात्काळ जखमीस पुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचार करून जखमीस पुढील उपचारासाठी नांदेडच्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान दरम्यान पोलिस कर्मचारी शिवराम मनमथ अस्टुरकर यांची प्राणज्योत मावळली घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी भेट दिली. या प्रकरणी फिर्यादी गजानन मनमथ अस्टुरकर तालूका पालम  राहणार पेठशिवणी जिल्हा परभणी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार टिप्पर चालक शरद कोंडीबा कळकेकर रा. टाकळगाव तालूका लोहा जिल्हा नांदेड यास अटक करण्यात आली असून गुन्हा रजिस्टर नंबर व कलम 234/2026 कलम 106 (1) 281 बि.एन. एस. सह कलम 187 मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्ग दर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक एस. एस. पडलवार हे करीत आहेत. मयत पोलीस कर्मचारी हे परभणी पोलीस मुख्यालयात कर्तव्य बजावुन नांदेड कडे सुटी घेऊन जात असताना काळाने त्यांच्या वर अर्ध्या वाटेतच झडप घातली त्यांनी देश सेवेसाठी काही काळ नोकरी करुन पुन्हा सेवा करण्यासाठी पोलिस खात्यात नोकरी पत्करली होती.



..
Previous Post Next Post