आमदार अमोलदादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना विविध योजनासाठी मोफत फॉर्म भरण्याचा कार्यक्रम संपन्न.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.२१ ( सुरेश पाटील )
आमदार अमोलदादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना विविध योजनाचा लाभ मिळण्यासाठी मोफत फॉर्म भरण्याचा कार्यक्रम यावल येथे संपन्न झाला.
यावल - रावेर विधानसभा मतदार संघातील लोकप्रीय आमदार यांच्या वाढदिवस सप्ताह निमिताने तालुक्यातील दिव्यांग बाधवांसाठी मोफत ईरिक्षा,बॅटरीवर चालणारी बाईक,नास्ता सेंटर,कलीपर क्लिपर,कुबड्या,कर्णयंत्र इ.सह ६१ दिव्यांगांचे मोफत फॉम भरण्यात आले.
गरजू गरीब दिव्यांग बाधवांना शासनाचे ऑनलाईन पोर्टल फॉम साठी कुठलीही सुविधा नसल्याने सदर शिबीरात ऑफलाईन फॉम भरून कार्यक्रमाचे आयोजक अरुण शामराव पाटील जिल्हा अध्यक्ष दिव्यांग आघाडी जळगांव जिल्हा पूर्व यानी जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे ठरविले आहे सदर कार्यक्रमात प्रस्तावीत भाषणात दिव्यांग बाधवांच्या अडी-अडचणी संदर्भात व शासनाच्या विविध योजना सोयी सुविधा बाबतीत माहिती देऊन मार्गदर्शन करून संबंधीत योजनांचे प्रस्ताव तयार करून दाखल करून पोहच घरपोच आणून देण्याचेही आश्वासन अरुण पाटील यांनी दिलेले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष यावल तालुका शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष नारायणबापु चौधरी,व्हाईस चेअरमन प्रविण वारके जिल्हा परिषद आरोग्य माजी सभापती नरेंद्र पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उज्जैनसिंग राजपूत,वैद्यकीय आघाडीचे डॉ.सुनिल आघाडी यावल तालुका भाजपा माजी अध्यक्ष उमेश फेगडे,याच्यासह हिरामण पाटील बुथप्रमुख नावरे गरबड पाटील,शकील तडवी, सदीप पाटील भाजपा कार्येकर्ते सह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार भाजपा दिव्यांग आघाडी जळगाव पूर्व जिल्हा अध्यक्ष अरुण पाटील, यांनी करून कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला.

