अकोल्यात बांधकाम साईटवर वायर चोरी करणारे ४ आरोपी जेरबंद; खदान पोलिसांची कारवाई, १.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त*

*अकोल्यात बांधकाम साईटवर वायर चोरी करणारे ४ आरोपी जेरबंद; खदान पोलिसांची कारवाई, १.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त*

अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान 

 अकोला:काँग्रेस नगर भागातील एका बांधकाम साईटवरून २० हजार रुपये किमतीची वायरिंग चोरी करणाऱ्या चार तरुण आरोपींना खदान पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली विना नंबर प्लेटची पल्सर मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.बांधकाम साईटवरून झाली होती चोरीमलकापूर येथील रहिवासी आकाश अरूण दामोदर (वय ३१, व्यवसाय-सुपरवायझर) यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार, ११ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास काँग्रेस नगर येथील एस.एस. डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवरील फ्लॅटमधून ६ एमएम जाडीचे वेगवेगळ्या रंगांचे सुमारे २५०० फूट वायरिंग (किंमत २०,००० रुपये) अज्ञात चोरांनी कट करून चोरून नेले होते. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३३१ (४), ३०५ भा.न्या.स. (BNS) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.CCTV फुटेजमुळे लागला सुगावागुन्ह्याचा तपास करत असताना खदान पोलिसांच्या तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून पाहणी केली. फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद मोपेड वाहनाचा शोध घेत चार आरोपींना ताब्यात घेतले.अटक केलेले आरोपी:१. विक्रम अजय राजगुरू (वय १९, रा. कान्हेरी सरफ, अकोला)२. ओम सावन तायडे (वय १९, रा. आंबेडकर नगर, अकोला)३. प्रज्वल कैलास तायडे (वय १९, रा. यशवंत नगर, वाशीम बायपास, अकोला)४. आदित्य राजू डोमाळे (वय १९, रा. नायगाव, अकोला)पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वायर चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली ९०,००० रुपये किमतीची बजाज पल्सर बाईक आणि १५,००० रुपये रोख असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.यांनी केली कारवाई:सदर धडक कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. मनोज केदारे, पोहेकॉ निलेश खंडारे, अमित दुबे, भूषण मोरे, अभिमन्यु सदांशिव आणि पोकॉ वैभव कस्तुरे यांनी केली आहे.*मीडिया पोलिस टाईम अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान*
Previous Post Next Post