पातूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय*

*पातूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय*

(अकोला पातुर तालुका प्रतिनिधी दूल्हे खान युसुफ खान)

पातूरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत काँग्रेसचे उमेदवार हिदायत खान उर्फ इद्दू पहलवान यांनी दणदणीत विजय मिळवत पातूरच्या सत्तेवर आपला मजबूत दावा सिद्ध केला. मतमोजणी सुरू होताच काँग्रेस समर्थकांमध्ये उत्साहाची लाट उसळली आणि शहरातील विविध भागांत विजयाचा जल्लोष सुरू झाला.

ही निवडणूक पातूरच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक चुरशीची आणि अटीतटीची निवडणूक मानली जात आहे. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत विकास योद्धा मंचाचे हाजी सय्यद बुरहान सय्यद नबी यांनी दुसरे स्थान मिळविले, तर भाजपाचे सचिन ढोणे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार हिदायत खान उर्फ इद्दू पहलवान यांनी उल्लेखनीय विजय संपादन केला. त्यांच्या सोबत काँग्रेसचे ८ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे २ नगरसेवकही विजयी झाले आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण, अकोला जिल्हा काँग्रेस (ग्रामीण) चे जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाशभाऊ तायडे, आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मुफ्ती हारून नदवी साहेब यांच्या प्रयत्नांमुळे विरोधकांच्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत सातत्याने प्रचारसभा, बैठका आणि जनसंपर्क मोहिमा राबविण्यात आल्या. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे काँग्रेस पक्षाला पातूर नगर परिषदेत लक्षणीय यश मिळाले.

विशेष म्हणजे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी या विजयाकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेली एक राजकीय भेट म्हणून पाहिले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

विजयानंतर आमदार साजिद खान पठाण, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. प्रकाश तायडे, अकोला महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन, अकोला महानगर काँग्रेस अध्यक्ष श्री. महेंद्र गवई, श्री. कपिल रावदेव आणि मो. युसुफ यांनी काँग्रेसचे नगराध्यक्ष आणि सर्व विजयी नगरसेवकांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी सर्व नेत्यांनी भविष्यात पातूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्व विजेत्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. पातूर शहरातील सर्व मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभारही मानण्यात आले.

या चुरशीच्या लढतीत अध्यक्ष पद के लिए विकास योद्धा मंच के हाजी सैय्यद बुरहान सैयद नबी दूसरे वही भाजपाचे सचिन ढोणे तिसऱ्या क्रमांकावर राहिले,  नगराध्यक्षपदासह नगरपरिषदेच्या 20 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. विकास योद्धा मंचालाही 8 जागा मिळाल्या असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 2 आणि भाजपाचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. . 

*२२ वर्षीय साद अहमद ठरले निवडणुकीचे युवा चेहरा*

या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा विषय ठरले काँग्रेसचे युवा उमेदवार साद अहमद असगर पठाण. अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी प्रभाग क्रमांक ४-ब मधून विजय मिळवत संपूर्ण निवडणुकीतील सर्वात कमी वयाचे 560 मतांनी आघाडी प्राप्त करूनविजयी उमेदवार होण्याचा मान पटकावला. नव्या चेहऱ्याचे आणि युवा नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणारा त्यांचा हा विजय पातूरच्या राजकारणात नव्या पिढीच्या प्रवेशाचे प्रतीक म्हणून पाहिला जात आहे.
Previous Post Next Post