आजाद समाज पार्टी (का)च्या आमरण अन्नत्याग आंदोलनाला मोठे यश; विटा येथील वृक्षारोपण थांबविण्याचे आदेश

 ....आजाद समाज पार्टी (का)च्या आमरण अन्नत्याग आंदोलनाला मोठे यश; विटा येथील वृक्षारोपण थांबविण्याचे आदेश


(छत्रपती संभाजी नगर उपसंपादक राजु साठे)

छत्रपती संभाजीनगर | दि. 19 जून 2026
आजाद समाज पार्टी (का)च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण अन्नत्याग आंदोलनाच्या नवव्या दिवशी आंदोलनाला महत्त्वाचे यश मिळाले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत कार्यवाही सुरू केली.

निवासी जिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी कन्नडच्या तहसीलदारांना तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर मौजे विटा, ता. कन्नड येथील गट क्र. 35, सर्वे क्र. 15 मध्ये सुरू असलेले वृक्षारोपण तात्काळ थांबविण्याचे लेखी आदेश देण्यात आले. तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत संबंधित काम थांबविण्याची कार्यवाही केली. त्यामुळे मागासवर्गीय भूमिहीन गायरानधारकांना दिलासा मिळाला आहे.

तसेच मौजे हसनखेडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय गायरान जमीन गट क्र. 63 शासन निर्णय दि. 12 जुलै 2011 नुसार भूमिहीन गायरानधारकांच्या नावावर नियमित करून 7/12 उताऱ्यावर नोंद करण्याबाबत तहसीलदारांना लेखी आदेश देण्यात आले. या प्रकरणात तातडीने योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून भूमिहीनांना न्याय देण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये विटा येथील गट क्र. 35, सर्वे क्र. 15 मधील वृक्षारोपण तात्काळ थांबवून मागासवर्गीय भूमिहीन गायरानधारकांना न्याय देणे तसेच हसनखेडा येथील गट क्र. 63 मधील शासकीय गायरान जमीन शासन निर्णयानुसार नियमित करून लाभार्थ्यांच्या नावावर 7/12 उताऱ्यावर नोंद करण्याची मागणी होती.

यावेळी आजाद समाज पार्टी (का)चे जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे, तालुका उपाध्यक्ष भगवान ठोकळ, अर्जुन खरात, कारभारी मोतीराम तेलूरे, तय्यब रजाक शहा, गणेश बाळू भवर तसेच मोठ्या संख्येने भूमिही
 गायरानधारक उपस्थित होते.

*विजय शिनगारे जिल्हाध्यक्ष*
*आजाद समाज पार्टी का छ संभाजीनगर औरंगाबाद*
Previous Post Next Post