शेळगाव नृसिंह फार्मर प्रोडूसर कंपनीच्या वतीने मोफत तुर बियाणे वाटप.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी देगलूर
देगलूर :शेळगाव (नृसिंह), ता. देगलूर येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या शेळगाव नृसिंह फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत तुर (गोदावरी सीड) बियाणे व फवारणी किटचे वाटप करण्यात आले.यावेळी तालुका कृषी अधिकारी मा. श्री. ड.झ. कावटवार साहेब तसेच कृषी सहाय्यक मा. श्री. रविंद्र बंडेवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.कंपनीच्या वतीने जवळपास ५० शेतकरी बांधवांना मोफत तुर बियाण्यांच्या बॅगा वितरित करण्यात आल्या. शेती उत्पादनात वाढ व्हावी, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मिळावा हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.शेळगाव नृसिंह फार्मर प्रोड्युसर कंपनी ही शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून भविष्यातही विविध कृषी उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम, बियाणे व कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला असून शेतकरी बांधवांनी कंपनीच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. शेळगाव नृसिंह फार्मर प्रोड्युसर कंपनी

