पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी अखेर लढा यशस्वी करून दाखवला !
महाराष्ट्र पोलीसांची DG लोनची यादी पोलीस महासंचालक कार्यालयाने प्रसिद्ध केली असून 2 ते 3 दिवसात खात्यावर पैसे जमा होणार !
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.२०
सन 2023 पासून प्रलंबित असलेले DG लोन { गृहकर्ज अग्रिम } महाराष्ट्र पोलीसांना लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे या मागणीसाठी गेली अडीच वर्ष गृहखात्याकडे सतत पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्यासाठी लढा देणारे
पोलीस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या लढ्याला अखेर 100 % यश आले असून 1768 .08 कोटी रुपये मंजूर झाले असून ,आज दिनांक 19 / 06 / 2026 रोजी पोलीस महासंचालक कार्यालय तर्फे DG लोन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेले 5 हजार 459 पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या नावाची यादी प्रसिद्ध केली असून येत्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे राज्य पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी प्रमोद वाघमारे यांचे आभार मानले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी आहे की , राज्य पोलीस दलातील सुमारे 5 हजाराच्या आसपास पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी घर बांधण्यासाठी DG लोन मंजूर होण्यासाठी सन 2023 मधे पोलीस महासंचालक कार्यालय यांच्याकडे अर्ज दाखल केले होते , परंतु गेली अडीच वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने यांचे DG लोन मंजूर होत नसल्या कारणाने आणि 2 वर्षांचा कालावधी होऊनही लोन मिळत नसल्याने राज्य पोलीस दलात नैराश्य पसरले होते ,तसेच काही पोलीस कर्मचारी यांनी तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही , तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे फोन करून प्रमोद वाघमारे सांगितले होते.
अखेर पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे तसेच त्यांचे सर्व जिल्हाध्यक्ष यांनी सन 2023 पासून प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकारी / आमदार / पालकमंत्री / यांचे मार्फत राज्याचे गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांना DG लोन लवकरात लवकर मिळावे या मागणीसाठी निवेदने दिली होती.
तसेच सन 2025 मध्ये डिसेंबर महिन्यात नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर भव्य मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता आणि गृहराज्यमंत्री श्री.पंकज भोयर साहेबांना भेटून निवेदन सुद्धा दिले होते.
अखेर प्रमोद वाघमारे यांच्या लढ्याला मोठे यश आले असून पोलीस महासंचालक कार्यालय तर्फे यादी प्रसिद्ध झाली असून येत्या 3 ते 4 दिवसात DG लोन धारक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या खात्यावर पैसे जाणार होणार असल्याचे समजते.
त्यामुळे प्रमोद वाघमारे यांचे राज्य पोलीस दलातून कौतुक होत असून पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी ही वयक्तिक फोन करून त्यांचे आभार मानत आहेत.
जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण नगरे उपाध्यक्ष हेमंत तावडे व जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी यांनी सांगितले आहे

