सरदार जी जी हायस्कूल व सौ कमलाबाई गर्ल्स हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
रावेर तालुका प्रतिनिधी
आज आंतरराष्ट्रीय योग दिनी पंचायत समिती शिक्षण विभाग व रावेर शिक्षण संवर्धक संघ संचलित सरदार जी जी हायस्कूल व सौ कमलाबाई गर्ल्स हायस्कूल व क्रीडा अधिकारी कार्यालय रावेर यांच्या वतीने गर्ल्स हायस्कूलच्या जिमखान्यामध्ये योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र बखाल सर, तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम सर, तालुका गट समन्वयक भूषण चौधरी सर, संस्थेचे चेअरमन संतोष शेठ अग्रवाल, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्रजी आठवले, संचालक विकास देशमुख, तुषार मानकर, विजय लोहार तसेच दोघं शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

