विकास विद्यालय, गिरड येथे महिमा राजहंस चौधरी हिचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित पार पडला.
93.99 टक्के गुणांसह GMC मध्ये MBBS साठी प्रवेश निश्चित...
(मीडीया पोलीस टाईम
राजु कांबळे
वर्धा, अमरावती , नागपूर विभागीय संपादक)
समुद्रपूर. : विकास विद्यालय, गिरड येथील मुख्याध्यापक/ प्राचार्य सन्माननीय श्री व्हि.एम. सोनकुसरे साहेब तसेच माजी मुख्याध्यापक /प्राचार्य सन्माननीय श्री. एस. व्हि. तडस साहेब तसेच पत्रकार आणि ह्युमन राईटस मानवाधिकार महाराष्ट्र उपाध्यक्ष अब्दुल कदीर, यांच्या हस्ते विकास विद्यालय गिरड ची विद्यार्थिनी महिमा राजहंस चौधरी हिचा आणि नुकताच L.L.B. चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे महिमाचा भाऊ सुमित राजहंस चौधरी यां दोघांचा सत्कार करण्यात आला आहे.
या सत्कार सोहळ्या प्रसंगी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक उमेश वाणी सर , पत्रकार शफी खान पठाण तसेच शिक्षक अभिजित डाखोरे, सुहास चाफले, राजु कांबळे, आतिश देवतळे, संदीप महाकाळे, जाधव मॅडम, सुनील धुळे, रवी गायकवाड, किशोर बारोकर, शिक्षिका कु. अर्चना चांगले, अंकित तडस ,तनु गलांडे, प्रणाली गाठे, पौर्णिमा चूटे, शिक्षकेत्तर कर्मचारी संजीव गवते, बंडूजी पाल, पी. जी. नाईक, जी. के.भगत उपस्थित होते.
समुद्रपूर तालुक्यातील गिरड (साखर बाहुली) नगरीतील महिमा राजहंस चौधरी हिने नीट - UG 2026 परीक्षेत उल्लेखनीय संपादन करीत 720 पैकी 479 गुण (93.99 टक्के ) गुण घेत आणि कठोर परिश्रम घेत , सातत्यापूर्ण अभ्यासाच्या बळावर आणि माहीमाने जिद्दीने, अत्यंत प्रतिकूल व आर्थिक दृष्ट्या मर्यादित परिस्थितीतही यशस्वी झाली.
तिच्या या यशामुळे गिरड गावासह संपूर्ण समुद्रपूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महिमाची हलाकीची परिस्थिती असूनही सोबतीला घरचे वातावरण शैक्षणिक असल्याने तसेच आताच LLB चे शिक्षण पूर्ण करून तिचा भाऊ सुमित चौधरी वकील पेशात येत असताना सुमित भाऊच्या हिमतीने तिचे स्वप्न पूर्ण झाले. आणि आई-वडिलांचे, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची आता मेहनत हे महत्वाचे घटक ठरले.
.

