पातूरच्या किड्स पॅराडाईजमध्ये अवतरली ‘ज्ञानाची पालखी’संत-महापुरुषांना वंदन, पुस्तकांचे पूजन अन् संस्कारमय प्रवेशोत्सवाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

पातूरच्या किड्स पॅराडाईजमध्ये अवतरली ‘ज्ञानाची पालखी’


संत-महापुरुषांना वंदन, पुस्तकांचे पूजन अन् संस्कारमय प्रवेशोत्सवाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

(पातुर अकोला तालुका प्रतिनिधी दुल्हे खान युसुफ खान)

पातूर : शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. या दिवसाला ज्ञान, संस्कार आणि भारतीय परंपरेची जोड देत पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक सत्र 2026-27 चा प्रारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात करण्यात आला.
शाळेत विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यपुस्तके, भारतीय संविधान, ग्रामगीता, तुकाराम गाथा यांसारख्या ज्ञानपर ग्रंथांचे पूजन करून त्यांची पालखी काढली.  उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या ‘ज्ञान दिंडी’ने परिसर  संस्कारमय झाला. यावेळी या ज्ञानाच्या पालखीचे पूजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ.  ज्योत्स्ना गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर संत आणि थोर महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन विद्यार्थी उभे होते. पालखीसोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने या महापुरुषांना वंदन करून त्यांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचा तसेच ज्ञानार्जनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संकल्प केला. त्यामुळे शाळेचा प्रवेशोत्सव हा केवळ स्वागताचा कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षणाची बीजे रुजविणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

प्री-प्रायमरीच्या  विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आले. 

हा अभिनव प्रवेशोत्सव शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे आणि कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नीतू ढोणे, नरेंद्र बोरकर, प्रियंका चव्हाण, बजरंग भुजबटराव, स्वप्निल पाटील, अविनाश पाटील,  शुभांगी बोरकर,  प्रतीक्षा भारसाकळे,, स्मितल उगले, वैशाली इंगळे, अक्षय तायडे, सदानंद कातखेडे, हरिष सौंदळे,  राजश्री खंडारे, तेजस्विनी गवई,  समीक्षा डोंगे,यांच्यासह कल्पना वानेरे, रोशनी नकाशे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Previous Post Next Post