राज्य माहिती आयुक्त नाशिक यांच्याकडून द्वितीय अपीलांची जलद गतीने सुनावणी.

राज्य माहिती आयुक्त नाशिक यांच्याकडून द्वितीय अपीलांची जलद गतीने सुनावणी.

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.२ 
नाशिक येथील राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांनी द्वितीय अपील जास्तीत जास्त सुनावणीसाठी तत्परतेने जलद गतीचा वापर करून एकाच वेळेला १० ते १५ द्वितीय अपील अर्जांची सुनावणी घेण्याचे कामकाज सुरू केल्याने ( म्हणजे ५ ते १० मिनिटात १० ते १५ द्वितीय अपील अर्जांची सुनावणी पूर्ण होत आहे ) 

गुरुवार दि. २ जुलै २०२६ रोजी १० दहा ते दुपारी  १ वाजेच्या सुमारास नाशिक येथील पिनॅकल मॉल मध्ये असलेल्या राज्य माहिती आयुक्त कार्यालयात अपीलार्थी,प्रथम अपिलीय अधिकारी,राज्य जन माहिती अधिकारी,सहाय्यक जन अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.त्यामुळे सकाळच्या सत्रात ३०० ते ४०० द्वितीय अपील अर्जांची सुनावणी घेतली गेली.त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रात सुद्धा अशाच प्रकारे सुनावणी घेतली जाणार असल्याने प्रलंबित असलेल्या द्वितीय अपीलांची संख्या झपाट्याने कमी होणार असल्याचे शासकीय चित्र वस्तुस्थिती निर्माण झाली आहे.

याचप्रमाणे राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर साहेब यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 
२००५ मधील कलम,नियम, तरतुदीनुसार व शासनाच्या विविध आदेशानुसार राज्य जन माहिती अधिकारी,सहाय्यक राज्य जन माहिती अधिकारी,
प्रथम अपिलीय अधिकारी हे माहितीचा अधिकार कायद्यामधील तरतुदीनुसार आणि मुदतीत माहिती देण्यासंदर्भात कार्यवाही करतात किंवा नाही याची द्वितीय अपील अर्ज सुनावणी दरम्यान सखोल चौकशी व कार्यवाही करून शास्तीची रक्कम वसूल करण्यासंदर्भात आणि कर्तव्यात कसूर दिरंगाई केली म्हणून योग्य ती कार्यवाही करून माहिती मागणाऱ्याला आवश्यक ती माहिती मिळवून दिल्यास द्वितीय अपील दाखल होण्याची संख्या फार कमी होईल अशी स्तरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.
Previous Post Next Post