पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची आंजी (मोठी) येथील जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
(मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आंजी (मोठी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी पोलीस अधीक्षकांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके आणि शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत अभ्यासात प्रगती करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, गावचे सरपंच, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली

