आता FDही सुरक्षित नाही; शहादा HDFC बँकेतील वृद्धाचा खात्यावर 33 लाखांचा 'डिजिटल दरोडा'!
हॅट्रिक घोटाळा ! तिसऱ्यांदा लाखोंचा अपहार..
(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा डी सी पाटील)
शहादा : शहादा येथील HDFC बँक पुन्हा एकदा घोटाळ्यामुळे चर्चेत आली आहे. एका ज्येष्ठ नागरिकाच्या मुदत ठेवीतून परवानगीशिवाय 33 लाख 5 हजार रुपये परस्पर वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल झाली असून, हा बँकेतील तिसरा अपहार असल्याची चर्चा आहे.
*काय घडलं:
ज्येष्ठ नागरिकाने बँकेत 26 लाखांची FD केली होती.
नूतनीकरणासाठी गेले असता खात्यात गडबड आढळली.
18 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 दरम्यान अशा केवळ 15 दिवसात त्यांच्या खात्यातून RTGS व UPI द्वारे परस्पर व्यवहार झाले.
26 लाखांचा RTGS आणि 5 हजार ते 11 लाखांपर्यंतचे 11 UPI व्यवहार — एकूण 33,05,000 रुपये गायब.
*तक्रारदाराचा आरोप:
"हे सर्व व्यवहार माझ्या परवानगीशिवाय झाले. माझी फसवणूक झाली आहे," असा थेट आरोप ज्येष्ठ नागरिकाने केला आहे. बँक प्रशासन, तत्कालीन शाखा व्यवस्थापक आणि तपासणी कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
*ही तिसरी वेळ:
शहादा HDFC मध्ये यापूर्वीही दोन वेळा अशाच प्रकारे लाखोंचा अपहार झाल्याची खातेदारांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे बँकेतील इतर खातेदारही धास्तावले आहेत. "आमचे पैसे सुरक्षित आहेत का?" असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
*काही अनुत्तरित प्रश्न:
तीन-तीन अपहार होऊनही बँकेने कारवाई का केली नाही?
आधीच्या दोन तक्रारींची चौकशी कुठे अडकली?
गुन्हा दाखल करण्यात पोलीस दिरंगाई का करत आहेत?
'प्रकरण मिटवण्यासाठी' तक्रारदारांवर दबाव टाकला जातोय का?
*सध्याची स्थिती:
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असली तरी तपास सुरू झाला की नाही, याबाबत अधिकृत माहिती नाही. बँक प्रशासनानेही मौन बाळगले आहे. वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाल्यास आणखी मोठा घोटाळा बाहेर येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

