अजिंक्य महाराष्ट्र न्यूजकडून निळकंठ वसू पाटील यांचा "अजिंक्यचा शिलेदार" सन्मान
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने अकोला जिल्हा प्रतिनिधी रायगड स्वाभिमान जिल्हा प्रतिनिधी युवा पत्रकार संघटना अकोट अध्यक्ष श्री. निळकंठ वसू पाटील यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत "अजिंक्यचा शिलेदार" हा सन्मान प्रशस्थी पत्र सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला
पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून समाजहित, सत्य आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी असते. या भावनेतून निळकंठ वसू पाटील यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा मानाचा सन्मान देण्यात आला.
याप्रसंगी अजिंक्य महाराष्ट्र न्यूजचे वरिष्ठ पदाधिकारी व संपादक मंडळ उपस्थित होते. सन्मानपत्र प्रदान करून त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
हा सन्मान अकोट तालुक्यासह अकोला जिल्ह्यातील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.हा सन्मान निळकंठ वसू यांना डॉ. श्रीपालजी सबणीस मा. संमेलन अध्यक्ष यांच्या हस्ते आमदार हेमंत रासने. संपादक संतोष लांडे. भगवान आढाव ग्लोबल सिक्युरिटी एम डी.उपसंपादक श्रीहरी अंभोरे ऍड नितीन परतानि. निवृत्ती पाटील छावा अकोला उपाध्यक्ष. सचिन तारू नायब तहसीलदार मावळ मुळशीआणि अजिंक्य न्यूज उपसंपादक किरण सोनोने आणि सर्व टीम यांच्या उपस्थित मध्ये अजिंक्य महाराष्ट्र न्यूज वर्धापन दिन आयोजित कार्यक्रम मध्ये देण्यात आला निर्भीड बातमी आणि पत्रकारिता मध्ये अन्याय वाचा फोडून सर्व सामान्य यांना न्याय दिला या बद्दल पुणे येथे कसबा पेठ नामदेव शिंपी हॉल मेट्रो स्टेशन समोर आयोजित भव्य दिव्य कार्यक्रम मध्ये देण्यात आला

