"अलहसनात उर्दू प्राथमिक शाळेची शिष्यवृत्तीत दमदार भरारी; UPS इयत्ता 7 वी परीक्षेत तीन विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी!"69.33, 68.66 आणि 63.33 गुणांसह विद्यार्थ्यांनी रावेरच्या उर्दू शिक्षणाची उंचावली मान; सैय्यद उज़ेर शाळेत प्रथम

"अलहसनात उर्दू प्राथमिक शाळेची शिष्यवृत्तीत दमदार भरारी; UPS इयत्ता 7 वी परीक्षेत तीन विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी!"

69.33, 68.66 आणि 63.33 गुणांसह विद्यार्थ्यांनी रावेरच्या उर्दू शिक्षणाची उंचावली मान; सैय्यद उज़ेर शाळेत प्रथम

(महाराष्ट्र राज्य जिल्हा विभागीय संपादक शेख शरीफ रावेर)


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (UPS) इयत्ता 7 वी – 2026 च्या अंतरिम (तात्पुरत्या) निकालात अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा, रावेर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक परंपरेला नवा गौरव प्राप्त करून दिला आहे.
या परीक्षेत सैय्यद उज़ेर सैय्यद युसुफ अली यांनी 69.33 गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. शेख अवेस शेख अलीम यांनी 68.66 गुण मिळवून द्वितीय, तर हुमेरा फारुक खाटीक हिने 63.33 गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. या तिन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेचे नाव संपूर्ण परिसरात अभिमानाने घेतले जात आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे प्रोत्साहन आणि वर्गशिक्षक शेख इमरान कमरुद्दीन यांच्यासह शिक्षकवृंदाचे मोलाचे मार्गदर्शन हे प्रमुख कारण ठरले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अलहसनात उर्दू प्राथमिक शाळेची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
शाळेचे मुख्याध्यापक कुरबान शरीफोद्दीन, शिक्षकवृंद, संस्थाचालक आणि पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post