सावकारी प्रकरणात यावल मंडळ अधिकारी याची एका दिवसात नोंद टाकण्याची कौतुकास्पद कामगिरी
संपूर्ण महाराष्ट्रात असा पॅटर्न राबवायला पाहिजे.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल (
यावल दि.२६
एका सावकारी प्रकरणात महाराष्ट्र राज्य पुणे सहकारी संस्था सावकाराचे महानिबंधक तथा अपर आयुक्त व विशेष निबंधक नागनाथ यगलेवाड यांनी दि. २५ जून २०२६ रोजी निकाल दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने तथा संशयित सावकार देवानंद नामदेव बडे रा.सावदा तालुका रावेर यांनी दि.९ जुलै २०२६ रोजी यावल तहसील कार्यालयात आवक - जावक रजिस्टरला लेखी अर्ज दिल्यानंतर मंडळ अधिकारी यांच्याकडे दि. १० जुलै २०२६ रोजी प्राप्त झाला. ७ / १२ दप्तरी नाव दाखल करण्याबाबत अर्ज दाखल झाला त्याच दिवशी यावल मंडळ अधिकारी संजय झेंडू शिरनाथ अर्जदाराचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याची तत्परता म्हणजे एकाच दिवसात शासकीय काम करण्याची शक्कल लढविल्याने आणि सावकारी प्रकरण असल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात या मंडळ अधिकाऱ्याच्या कौतुकास्पद कामगिरी बाबत जोरदार चर्चा असून महसुलमधील ही प्रथा महसूलमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविल्यास शेतकरी वर्गात महसूल विभागाची तोंड भरून कौतुक केले जाईल अशी चर्चा जळगाव जिल्ह्यात आहे.
यावल मंडळ अधिकारी यांच्याकडील नोंद क्र. २९८७० प्रत्यक्ष बघितली असता
फेरफाराचा प्रकार : अनोंदणीकृत फेरफार
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दि. १०-०७-२०२६ माहिती मिळालेचा दि. १०-०७-२०२६
अधिकारी आयुक्त आदेश क्रमांक : क्रं.जा.क्रं. सआ३ / साव / पु. अ.१०/२०२६/३१६/
२०२६ आदेश दि.२५ जून २०२६
सावकारांचे महानिबंधक तथा अपर आयुक्त व विशेष निबंधक, सहकारी संस्था,महाराष्ट्र, राज्य, पुणे यांचे कडील महाराष्ट्र सावकारी ( नियमन ) अधिनियम २०१४ चे कलम ९ आणि महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब सहकार पणन व वस्त्रेद्योग विभाग मंत्रालय, मुंबई यांचे कडील अधिसुचना क्रमांक- एमएलए १०१४/प्र.क्रं. २७७/७-स, दि.०९ ऑक्टोबर, २०१४ अन्वये आदेश क्रं.जा.क्रं. सआ३ / साव पु.अ.१० / २०२६
/ ३१६ / २०२६ सहकार आयुक्त व निबंधक, सहकार संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे - १ याचे कार्यालय दि.२५/०६/२०२६ नुसार पुनरिक्षण अर्जदार यांचा पुनरिक्षण अर्ज क्र. १०/२०२६
मंजुर करण्यात आला असून गैरअर्जदार क्रं. २ जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
जळगांव यांचे दि.२४ नोव्हेंबर २०२२ व गैरअर्जदार विभागीय सहनिबंधक,सह.संस्था नाशिक यांचे दि.१५ मे २०२३ रोजीचे आदेश रद्द करण्यात आला आहे.
अशाप्रकारे नोंद मध्ये यावल मंडळ अधिकारी संजय झेंडू शिरनाथ यांनी नमूद केले आहे.
मंडळ कार्यालयात एका दिवसात अर्ज द्या आणि एका दिवसात नोंद करून घ्या. असा शुभारंभ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आश्चर्यजनक कौतुकास्पद चर्चा आहे.

