नांदेड देगलूर महामार्गावर बिजूर येथे, भीषण अपघात अपघातात एक ठार एक जखमी.
देगलूर नरसी रोड चौपदरीकरण कधी होणार,आणखी किती जिवे जाणार लोकप्रतिनिधी, लक्ष देण्याची गरज.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :बिलोली तालुक्यातून नांदेड - हैदराबाद जाणाऱ्या महामार्गावर तालुक्यातील बिजूर शिवारात, ट्रक व मोटरसायकल मध्ये भीषण अपघात घडून अपघातात मोटरसायकलवरील मोटरसायकल चालक मुलगा जाग्यावर ठार तर,आई गंभीर जखमी झाली आहे.
बिलोली तालुक्यातील हिप्परगाथडी येथील, नवतरुण युवक अहेमद मोहम्मद शेख वय (२८) व त्याची आई अल्लावली मोहम्मद शेख, वय (५२) हे दोघे नवीन घेतलेल्या पल्सर मोटरसायकलवर बसून दी २५ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हिप्परगाथडी येथून नांदेड - हैदराबाद महामार्गावरून नायगाव येथील दवाखान्यास जात होते. बिलोली तालुक्यातील बिजूर गावासमोर थोडीफार अंतरावर गेले असता समोरून येणारा ट्रक क्रमांक आर.जे.०६, जी. डी. ०३०० व मोटरसायकल मध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघातात मोटरसायकल स्वराच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन,तो जागेवरच गतप्राण झाला तर त्याच्यासोबत असलेली त्याची आई मात्र गंभीर जखमी झाली आहे. नांदेड देगलूर हा राष्ट्रीय हैदराबाद दिल्ली जोडणारा महामार्ग असून, या महामार्गात देगलूर ते नरसी हा रोड अत्यंत वळण घेत छोटासा रस्ता झाला आहे दिल्ली ते हैदराबाद रस्त्यावरती ट्राफिक लक्षात घेता देगलूर ते नरसी चौपदरीकरण कधी होणार व किती जिवे जाणार,आठ दिवसांमध्ये दहा ते पंधरा अपघात, या ठिकाणी होत असतात त्यामध्ये पाच जखमी तर दहा मृत्यू होत असतात,यामुळे याची दखल लोकप्रतिनिधी व प्रशासनाने घ्यावे आणि तात्काळ नरसी ते देगलूर ते रोड चौपदरीकरण करावे अशी नागरिकांमधून विनंती प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना करत आहेत चौपदरीकरण कधी होईल माहित नाही मात्र जिवे मात्र तरुणांचे त्या ठिकाणी जात आहेत,हिप्परगा थडी येथील अहेमद मोहम्मद शेख हा तरुण खूप कष्टी होता घराचे बांधकाम चालू होते, आणि आईची तब्येत बरोबर नसल्यामुळे नायगाव या ठिकाणी आईला दवाखान्यासाठी घेऊन जात होता, आणि त्यातच हा मोठा अपघात या झाला याबद्दल सर्व तालुका व गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत व प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना याकडे लक्ष देण्याची खूप गरज, असून देगलूर ते नरसी रोड हा चौपदरीकरण तात्काळ व्हावे अशी जनतेतून मागणी होत आहे.

