हिंगणघाट परिसरात गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
. पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा ,गुन्हे प्रगटीकरन पथकाचे पो.हवा प्रशांत ठोंबरे व अंमलदार हे पोलीस स्टेशन हिंगणघाट परिसरात मा. वरीष्ठांचे आदेशाने निवडणूक संबंधाने अवैध धंदयावर कार्यवाही करीता पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीर द्वारे खात्रीशीर माहीती मिळाली की, खंडोबा वॉर्ड हिंगणघाट येथे राहणारा राहुल दानव हा गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देषाने त्याचे राहते घरी बाळगुण आहे व त्याने पांढऱ्या रंगाचा डिझाईनचा शर्ट व काळया रंगाचा पँट घातलेला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. श्री. सुशीलकुमार नायक साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट यांना देऊन खबरेप्रमाणे पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. आदेशाप्रमाणे स्वतः पंच ,पो स्टॉप ,मापारी,व फॉरेन्सिक टीम सह राहुल दानव राहणार खंडोबा वॉर्ड याचे घरी गेलो असता एक इसम घरी हजर मिळून आला. पंच समक्ष त्याचे नाव, पत्ता, विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल सुभाष दानव वय 21 वर्ष रा. खंडोबा वार्ड, हिंगणघाट जि, वर्धा असे सांगितले. पंचासमक्ष त्याची घरची कायदेशीर रित्या घरझडती घेतली असता त्याचे घरचे लोखंडी कपाटात असलेल्या 1) एका पांढ-या रंगाचे प्लास्टिक पन्न्नीमधील हिरवट काळपट रंगाची पाने, फुले, देठ, कळया व बिया असलेली ओलसर, वनस्पती गांजा नावाचा अंमली पदार्थ व पन्नीसह वजन एकुण वजन - 382 ग्रॅम किंमत 9,400 रू 2) एक जुना वापरता विवो कंपनीचा मोबाईल कि. 15,000 रू असा जू.किं. असा जु.किं. 24,400 रू चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल फॉरेन्सिक टीमच्या मदतीने जप्त करून पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे आरोपीविरूध्द एन.डी.पी.एस अँक्ट कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून .आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदरची संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा श्री. सुशीलकुमार नायक सा. यांचे आदेशाने मा. पोलीस निरीक्षक श्री अनिल राऊत सा. व डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास सपोनि अतुल स्थूल पो.स्टे हिंगणघाट करीत आहे.

