यावल पोलीस ठाण्याचा अनोखा उपक्रम.भाड मे जाए जनता और अपना काम बनता..पोलीस निरीक्षक म्हणतात आम्हाला साक्षीदार पाहिजे तेव्हा आम्ही अवैध धंद्यांवर दारु अड्यांवर छापा मारु..तसेच आम्हाला दारू पाजुन पाजुन मारुन टाका तेव्हाच अवैध दारु बंद करा .. परिसरातील जनतेसह जळगाव जिल्ह्याच्या जनतेमध्ये जोरदार चर्चा..निवेदनानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ .निवेदनावर जवळपास 300 लोकांच्या सह्या ..

यावल पोलीस ठाण्याचा अनोखा उपक्रम.भाड मे जाए जनता और अपना काम बनता..
पोलीस निरीक्षक म्हणतात आम्हाला साक्षीदार पाहिजे तेव्हा आम्ही अवैध धंद्यांवर दारु अड्यांवर छापा मारु..

तसेच आम्हाला दारू पाजुन पाजुन मारुन टाका तेव्हाच अवैध दारु बंद करा .. परिसरातील जनतेसह जळगाव जिल्ह्याच्या जनतेमध्ये जोरदार चर्चा..

निवेदनानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ .निवेदनावर जवळपास 300  लोकांच्या सह्या ..


(महाराष्ट्र राज्य क्राईम रिपोर्टर 

जळगाव जिल्हा च्या यावल तालुक्यातील आडगाव गावात अवैध दारुच्या व्यसनामुळे अनेक संसार उद्धवस्त होतांना दिसत आहेत तरीही यावल पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक म्हणतात आम्हाला काहीच माहीत नाही की अवैध धंदे अवैध दारू कुठे सुरू आहे..जनतेला म्हणतात तुम्ही आम्हाला सांगा अवैध दारू धंदा कुठे सुरू आहे.आम्ही छापा मारू जर असे आहे.तर तालुक्याचे पोलीस निरीक्षक साहेब कोणाची वाट बघत आहेत अवैध दारु वर कारवाई करण्याची,आडगाव गावांसह तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दारुचा महापुर सुरू आहे..आणि जास्त माहिती पोलीस प्रशासनच्या बीट हवालदारांच विचारा तेच सांगतिल तुम्हाला अशी जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्याच्या जनतेमध्ये वाऱ्या सारखी पसरली आहे..राजरोसपणे सर्रास सुरू असलेल्या अवैध धंदे अवैध दारू विक्रीमुळे अनेक गावातील सामाजिक आणि शांततेचे वातावरण बिघडत आहे. या अवैध दारू व्यवसायावर तात्काळ बंदी घालण्यात यावी आणि अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक पोलीस पाटील यांना नुकतेच रीतसर निवेदन देण्यात आले होते.ते निवेदन पोलीस निरीक्षक यावल यांचेकडे देण्यात आले असुन अद्याप कुठलीही अवैध धंद्यांची कारवाई झाली नसल्याचे चित्र आहे.  अवैध धंदे दारु अशा या गंभीर बाबीकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले जात असून, आतापर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गावात ठिकठिकाणी अवैध दारूची विक्री सुरू असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत ढकलली जात आहे. दारूमुळे अनेक कुटुंबांची वाताहात झाली असून, गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना घराबाहेर पडणे किंवा रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. गावात शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस प्रशासन सदैव जनतेच्या सेवेसाठी आहेत मात्र यावल तालुक्यातील आडगाव गावात यावल पोलीसांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने, सध्या स्थितीत ग्रामस्थ व महिला वर्ग परिसरातील जनता आक्रमक मोडमध्ये आले आहेत. "गावातील दारू विक्री तात्काळ बंद न झाल्यास आणि संबंधित  योग्य ती कारवाई न केल्यास, लोकशाही मार्गाने पोलीस अधीक्षक (SP), राज्य उत्पादन शुल्क विभाग (Excise Dept.) आणि तहसीलदारांकडे तक्रार करणार आहोत. तसेच गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आता तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी हस्तक्षेप करून गावात अवैध दारूबंदी लागू करणार का? काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
(आडगाव येथील सर्व महिला व पुरुष ग्रामस्थ आणि परिसरातील जनतेचे लक्ष लागुन आहे.तसेच या गंभीर समस्येकडे जनतेच्या हितासाठी संबंधित पोलीस प्रशासनाने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही तालुक्यातील जनतेसह जळगाव जिल्ह्यातील जनतेने यावल पोलीस प्रशासनाला देण्यात येईल
Previous Post Next Post