23 वर्षे गर्भवती महिलेचा मृत्यू.....नातेवाईकांसह गावावर शोककळा पसरली...

23 वर्षे गर्भवती महिलेचा मृत्यू.....नातेवाईकांसह गावावर शोककळा पसरली... 

(किनवट तालुका प्रतिनिधी/ विलास भालेराव. )

   किनवट तालुक्यातील शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या लोखंडवाडी तालुका किनवट येथील शेतकरी महिला कल्पना चंपती ढोले वय 23 वर्षे हिचा मृत्यू झाला असून ती आठ महिन्याची गरोदर असल्याचे कळते. 
  सविस्तर माहिती अशी की कल्पना चंपती ढोले हि राहणार लोखंडवाडी तालुका किनवट येथील रहिवासी असून ती सध्या आठ महिन्याची गरोदर होती व तिला दोन वर्षाची एक मुलगी आहे. गरोदरपणात तब्येत ठीक नसल्याने ती खाजगी दवाखान्यातील उपचार करत होती परंतु आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने 108 गाडीला कॉल करून बोलावून घेतले व थेट जवळच असलेल्या इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता, तेथील उपस्थित डॉक्टर वैष्णवी वाकोडेकर यांनी तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले तेव्हा नातेवाईकासह उपस्थित पत्ती ही हंबरडा फोडून लढत होते व दुसरीकडे पोलिसाचा पंचनामा आणि स्वविच्छेदन नाची प्रक्रिया सुरू होती यावर संबंधित अधिकारी व कार्यकर्ते याकडे लक्ष देऊन त्या महिलेला न्याय मिळवून देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post