निंबादेवी,वड्री,मोर,हरिपुरा, धरणासह शेळगाव बॅरेज,वाघझिरा तलाव इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी सक्त मनाई.यावल तहसीलदार यांचा सक्त आदेश.

निंबादेवी,वड्री,मोर,हरिपुरा, धरणासह शेळगाव बॅरेज,
वाघझिरा तलाव इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी सक्त मनाई.

यावल तहसीलदार यांची सक्त आदेश.

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.३१ जुलै २०२६
तालुक्यातील निंबादेवी,वड्री,
मोर,हरिपुरा,धरणासह शेळगाव बॅरेज,वाघझिरा तलाव इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सक्त मनाई केल्याच्या आदेश काढले आहे.

यावल तहसीलदार मोहनमाला नाझीकर यांनी दिलेली माहिती अशी की यावल तालुक्यातील तमाम नागरीकांना कळविण्यात येते की,१ दि. जून, २०२६ ते ३१ ऑक्टोंबर,२०२६ या कालावधीत मान्सुन पडत असतो.सदर कालावधीत अतिवृष्टी मुळे छोटे मोठे तलाव,धरण,पाटात अचानक पाणी सोडले जाते व पाऊस पडल्यानंतर वरील छोटे धरण, नदी,तलाव,पाटाच्या ठिकाणी मोठया प्रमाणावर नागरीकांची गर्दी होत असते.
त्यामुळे तेथे दुर्घटना होण्याची दाट शक्यता असल्याने यावल तहसीलदार मोहनमाला नाझीकर तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या नात्याने असे आदेशित करते की,मान्सुन कालावधीत मनुष्यहानी,प्राणी हानी होऊ नये या करीता निंबादेवी धरण, वाघझिरा तलाव,वड्री धरण,मोर धरण,
हरीपुरा धरण,यावल येथील पाटचारी,यावल येथील तलाव,शेळगाव बॅरेज येथे नागरीकांना जाण्यास पुढील आदेश होई पावेतो सक्त मनाई करण्यात येत आहे.सदर ठिकाणी नागरीक आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे सक्तीचे आदेश काढण्यात आले आहे.
Previous Post Next Post