अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त देगलूर शहरात पोलिसांचा रूट मार्च.
दंगा काबू पथकाचे प्रात्यक्षिक; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा सज्जतेचा संदेश.
(माहेमूद पिंजारी
तालुका प्रतिनिधी देगलूर )
देगलूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित देगलूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी देगलूर पोलिसांच्या वतीने दंगा काबू पथकाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावर पोलिसांनी रूट मार्च काढून नागरिकांना शांतता, सामाजिक सलोखा आणि कायद्याचे पालन करण्यांचे आवाहन केले. या उपक्रमाचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांनी केले. पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचान्यांनी दंगा नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या विविध हालचालींचे प्रात्यक्षिक सादर केले. कोणत्याही आपत्कालीन अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित देगलूर शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट व पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या रूट मार्च व दंगा काबू पथकाच्या प्रात्यक्षिकाची दृश्ये. परिस्थीतीला तात्काळ प्रतिसाद देण्यसाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. यानंतर शहरातील प्रमुख मार्गावर मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचान्यांच्या सहभागाने रूट मार्च काढण्यात आला, नागरिकांनी अफव्यांवर विश्वास ठेवू नये, कायद्याचे पालन करावे आणि शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पडावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सामाजिक सलोखा कायम राहावा या उदेशाने हा रूट मार्च व दंगा काबू प्रात्येक्षिक आयोजित करण्यात आले. नागरिकांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करून सहकार्याची भूमिका घेतली.

