: नागलवाडी रस्त्यालगत गट नं. १३/१ मध्ये १०० ब्रास डबर व ३०० ब्रास रेतीचा बेकायदेशीर साठा; चौकशीची मागणी
(चोपडा तालुका प्रतिनिधी)
चोपडा (जि. जळगाव): नागलवाडी रस्त्यालगत असलेल्या गट क्रमांक १३/१ मध्ये सुमारे १०० ब्रास डबर व ३०० ब्रास रेतीचा बेकायदेशीर साठा करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या जमिनीचे शेतमालक कृष्णकांत प्रभुलाल झंवर हे असून, सदर ठिकाणी विना परवाना विना रॉयल्टी मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचा साठा करूणे सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नियमानुसार अशा साठ्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाची परवानगी आवश्यक असताना कोणतीही परवानगी न घेता हा व्यवसाय सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करून साठा जप्त करावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

