युवाकवी नवनाथ पोकळे यांना आदर्श कला शिक्षक पुरस्कार

युवाकवी नवनाथ पोकळे यांना आदर्श कला शिक्षक पुरस्कार

(अहिल्यानगर विभागीय संपादक (प्रशांत बाफना) : 

साईकला नाट्य संस्था पुणे व कोहिनूर ग्रुप पुणे यांच्याकडून देण्यात येणारा आदर्श कला शिक्षक पुरस्कार युवाकवी नवनाथ पोकळे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती साई कला नाट्य संस्थेचे अध्यक्ष कवी राजेंद्र सोनवणे यांनी दिली.15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा संस्थेचे अध्यक्ष योगेशशेठ भंडारी, उपाध्यक्ष बिपिनजी भंडारी, अनिल झाडमुथा, सचिव हेमंतशेठ पोखरणा, कोषाध्यक्ष डॉ.उमेश गांधी, कार्याध्यक्ष कांतीलाल चाणोदिया, मंडळ अध्यक्ष गोकुळशेठ मेहेर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्राचार्य भंडारी सर, पडोळे सर, मुख्याध्यापक शिकारे सर, गोले सर, अजित गुगळे, निलेश गांधी, प्रा.कटारिया, प्रा.मगर, पेटकर सर, रावळ सर, पोखरणा सर, मराठे सर, लांडगे सर, काळे सर, रांगुळे सर या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. आदर्श कला शिक्षक व आदर्श शिक्षक हे दोन पुरस्कार त्यांना यापूर्वी अहिल्यानगर येथील अनाथ सेवक संस्थेच्या माध्यमातून मिळाले आहेत तसेच साहित्य क्षेत्रातही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
         नवनाथ पोकळे हे एकता फाउंडेशन बीड जिल्हा युवक प्रतिनिधी आहेत. पुढील वाटचालीसाठी एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी संचालक साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, उपाध्यक्ष नितीन कैतके, मिरा दगडखैर, महिला आघाडी प्रमुख रंजना फुंदे, सल्लागार एड.भाग्यश्री ढाकणे, प्रवक्ता मल्हारी खेडकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डाॅ.सचिन सानप, राजेश बीडकर, कैलास तुपे, डाॅ.शोभा सानप, रंजना डोळे, शोभा राजळे, लता बडे, दीपक महाले, माही शेख, फौजी कैलास खेडकर, हरिप्रसाद गाडेकर, पो.काॅ.ज्ञानेश्वर पोकळे, महादेव राऊत, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष संपादक अन्सार शेख, युवक प्रदेश निमंत्रक इम्रान शेख, युवक प्रदेश सरचिटणीस बलराम मनिठे, एकता फाउंडेशन पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डाॅ.बाळासाहेब कोठुळे, एकता फाउंडेशन मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, विभागीय सचिव अंबादास केदार, विभागीय महिला आघाडी प्रमुख प्रा.डाॅ.संगीता घुगे, एकता फाउंडेशन आहिल्यानगर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पत्रकार प्रशांत बाफना तसेच एकता फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सर्व मित्र परिवाराकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
Previous Post Next Post