लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)

विलास केजरकर भंडारा.
भंडारा:-  ओबीसी संघर्ष समिती भंडाराच्या वतीने ओबीसी संघर्ष समिती भंडाराच्या वतीने जगत विख्यात साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ वी जयंती ओबीसी संघर्ष समिती च्या आंदोलन मंडप त्रिमूर्ती चौक भंडारा येथे  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी संघर्ष समिती भंडाराचे चे मुख्य संयोजक सदानंद इलमे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, निमंत्रक रोशन उरकुडे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, संविधान संघर्ष समितिचे चंद्रशेखर टेंभुर्णे, रमेश शहारे, विष्णुदास जगनाडे, पंजाबराव कारेमोरे, राजेश मडामे, रोशन जांभुळकर, इंजि. रूपचंद रामटेके, सुधाकर मोथरकर राजकुमार लांजेवार, श्रीकृष्ण पडोळे, अजाबराव चिचामे, उमेश शिंगनजुडे, ग्यानचंद जांभुळकर, दिलीप चोपकर, मुकुंदा पाचे, श्रीराम बोरकर, कमलेश सार्वे, परमेश्वर वलके, रंजीत कोल्हटकर, पर्यावरण प्रेमी विलास केजरकर, असित बागडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
            त्यावेळी जगत विख्यात साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. घोषणा देण्यात आल्या. तसेच उपस्थित मान्यवरांनी जगत विख्यात साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन चारित्र्यावर मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
Previous Post Next Post