दहिगावात प्रमुख चौकातील सेतू सुविधा केंद्रातून पन्नास हजारांची चोरी.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.१४
यावल तालुक्यातील दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेल्या सेतू सुविधा केंद्रामधून पन्नास हजार रुपयाची रोकड अज्ञात चोरट्यांनी दि.१३ व १४ चे रात्री लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिगाव येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरासमोरील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या व्यापार संकुलनामधील स्वराज्य सेतू सुविधा केंद्रातून रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कडी कोंडे कापून आत प्रवेश करीत ५० हजार रुपयाची रोकड लंपास केली असल्याची फिर्याद सुविधा केंद्राचे संचालक सुदर्शन अभिमन्यू पाटील यांनी यावल पोलिसात दिले वरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसात प्रमुख चौकातील व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे एका पान टपरी मधून ६६ हजार रुपयांची रोकड पान टपरीच्या दरवाजाचे कळी कोंडे कापून लंपास केली होती.त्याचप्रमाणे आणखी दोन व्यवसायिकांचे दुकाने फोडण्याचा प्रकार घडला होता. तर गावातही वाढीव वस्ती मधून काही वस्तू लंपास झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या प्रकारामुळे व्यवसायिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.दहिगाव दूर क्षेत्र आहे. मात्र तेथे स्थानिक पोलीस प्रशासन नाही त्यामुळे असे प्रकार घडतात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या गंभीर प्रश्नाकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली दहिगाव क्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत

