सगरोळी येथे श्री केदारेश्वर महादेव मंदिरात सौ.गंगामणी गिरगांवकर/खंदारे यांच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ..
उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांची प्रमुख उपस्थिती..
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे सगरोळी नगरीचे ग्राम दैवत असलेले हे श्री केदारेश्वर महादेव मंदिर मुख्य बाजार पेठेत,असून याच परिसरात गिरगांवकर परिवाराचे वास्तव्य आहे. सोबतच सौ. गंगामणी गिरगावकर व त्यांचे सर्व बंधु शासकीय सेवेत यशस्वी काम करून नाव लौकिक प्राप्त केले,आहेत, गिरगांवकर परिवाराच्या या यशात श्री केदारेश्वर महादेव मंदिराचे आशीर्वाद असल्याने आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा /अभिषेक करून किर्तन व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित,करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया सेवानिवृत्त अधिकारी मधु गिरगांवकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खाजगी,सचिव बालाजी पाटील खतगावकर, देविदास देशमुख, सुनीलराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हयगले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी विश्वनाथ पाटील समन, माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार, भीमराव जेठे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख बाबाराव रोकडे, शिवसेना उद्धव ठाकरे गट बिलोली तालुका प्रमुख शिवकुमार पाटील बामणे, शिवसेना शिंदे गट बिलोली शहर प्रमुख लक्ष्मण शेट्टीवार, सुनील यंबडवार यांच्यासह अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित राहून किर्तन व महाप्रसाद कार्यक्रमाचा लाभ घेतला..

