वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई येथील आंदोलनात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे -शेख गौस रामतीर्थकर

वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई येथील आंदोलनात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे -शेख गौस रामतीर्थकर 

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 1 अक्टूबर रोजी मुंबईतील, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे इराणच्या मुद्यावर आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात, बिलोली तालुक्यातील जनतेनी हजारोंच्या संख्येने, सहभागी व्हावे आसे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य शेख गौस रामतीर्थकर यांनी केले आहे, पश्चिम आशियातील संघर्षांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कच्चा तेलाच्या किमतीवर तसेच,सर्वसामान्य नागरिकावर होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे, भारताने राष्ट्रीय व आर्थिक हिताचा विचार करून इराणबरोबर स्वतंत्र भूमिका घ्यावी या मागणीसाठी,आम्ही भारतीय ईरान सोबत आहोत या भूमिकेतून आंदोलन आयोजित करण्यात आला आहे, बिलोली तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, व अल्पसंख्याक विभागाचे सर्व कार्यकर्ते, मुस्लिम समाज, ओबीसी, एससी,एसटी, सर्व नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे उपस्थित राहावे, अशा आव्हान वंचित बहुजन आघाडीचे मुस्लिम समाजाचे नेते पत्रकार शेख गौसभाई रामतीर्थकर यांनी केले आहे.
Previous Post Next Post