राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचा आमदार हेमंत ओगले यांच्या हस्ते सन्मान..
(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी कामगार वसाहत मधील श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ व छावा साम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने श्रीरामपूर -राहुरी विधानसभेचे आमदार श्री .हेमंत ओगले यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती व राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचा सन्मान सोहळ्याचे आयोजन मंडळाकडून करण्यात आले होते .
यावेळी श्रीरामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष करण दादा ससाणे दत्तात्रेय कडू पाटील शिवनेरी हॉलीबॉल चे प्रशिक्षक राजेंद्र पुजारी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक व गटनेते दासू भाऊ पठारे शरद वाळुंज बँकेचे राहुल भाऊ मोरे शरद वाळके आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन मंडळाचे मार्गदर्शक श्री वैभव दादा गिरमे यांनी केले .

