*सीसीटीव्ही ठरले पोलिसांचे अस्त्र; रावेर घरफोडीचा २४ तासांत छडा*
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रावेर गुन्हे शोध पथकाची कारवाई..
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी । जितु इंगळे)
रावेर शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरात दिवसा बंद घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून घरफोडी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत ही कारवाई केली.
याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३०/२०२६ अन्वये भादंवि कलम ३०५, ३३९(३), ३(६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला5 आहे.
फिर्यादी कल्पना सुभाष वाणी (वय ५२), व्यवसाय अंगणवाडी सेविका, रा. मधुसूदन मेडिकलसमोर, जुनी नगरपालिका रोड, रावेर, या १९5t सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दुपारी सुमारे २ वाजता त्या घरी परतल्यानंतर घरातील सामानत अस्ताव्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला.
घराची पाहणी केली असता रोख ६० हजार रुपये, दोन तोळ्यांचे सोन्याचेT लॉकेट तसेच प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरीस गेल्याचे आढळून आले. त्यानंतर फिर्यादीने रावेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी रावेर शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.t तपासादरम्यान एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित आरोपींचे चेहरे स्पष्टपणे दिसून आल्याने पोलिसांना तपासाची महत्त्वाची दिशा मिळाली.
सीसीटीव्ही फुटेज व उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत रितेश रवींद्र नेवे (वय ३९, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, कलेक्टर बंगल्याच्या मागे, जळगाव) आणि गजेंद्र सोपान चौधरी (वय ३८, रा. ममुराबाद, इंदिरानगर, ईदगाह रोड, जळगाव; हल्ली मुक्काम सिलवासा, जि. नगर हवेली) यांना जेरबंद केले.
रावेर पोलिसांच्या तत्पर तपासामुळे घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आला असून, पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत.

